ETV Bharat / entertainment

Guilty Minds : ‘गिल्टी माईंड्स’ मध्ये श्रिया पिळगांवकर दिसणार प्रमुख भूमिकेत! - दीपक कालरा

परंतु आगामी ‘गिल्टी माईंड्स’ या हिंदी वेब सिरीज मध्ये मराठमोळी श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar in Guilty Minds) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात ती एका नामांकित वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्राईम व्हिडिओची निर्मिती असलेल्या कायद्यावर आधारित या ‘गिल्टी माईंड्स’ मध्ये श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar
author img

By

Published : Apr 24, 2022, 1:14 PM IST

मुंबई : परंतु आगामी ‘गिल्टी माईंड्स’ या हिंदी वेब सिरीज मध्ये मराठमोळी श्रिया पिळगांवकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात ती एका नामांकित वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्राईम व्हिडिओची निर्मिती असलेल्या कायद्यावर आधारित या ‘गिल्टी माईंड्स’ मध्ये श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. शेफाली भूषणची निर्मिती आणि दिग्दर्शन तसेच जयंत दिगंबर सोमाळकरचे सह-दिग्दर्शन केले आहे.

Guilty Minds
गिल्टी माईंड्स
दोन तरूण आणि महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास गिल्टी माईंड्स या नाट्यातून उलगडतो. यातील एक व्यक्ती म्हणजे सदाचाराचे प्रतीक तर दुसरी व्यक्ति अग्रगण्य लॉ फर्ममध्ये कार्यरत आहे. या मालिकेत नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामिन गिलानी, विरेन्द्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सतरूपा यासारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे करिश्मा तन्ना, शक्ति कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, गिरीश कुलकर्णी आणि सानंद वर्मा हे अभिनेते अन्य भूमिकेत आणि पाहुणे कलाकार म्हणून दिसतील.
Shriya Pilgaonkar
श्रिया पिळगांवकर

भूमिका आव्हानात्मक
“मला माझ्या भूमिकेची फारशी तयारी करावी लागली नाही कारण दिग्दर्शिका शेफाली ला कायद्याची पार्श्वभूमी आहे आणि लेखकांमध्येही वकिली क्षेत्राचे लोक आहेत. त्यामुळे आमच्या शोचे लिखाण सत्यावर आधारित आहे. थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे ती म्हणजे यातील केसेस मधील रेंगाळलेपण वजा करण्यात आले आहे. मी माझे वकील मित्रमैत्रिणींशी सल्लामसलत केली आणि माझे हे कॅरॅक्टर उभे केले. माझ्या कॅरॅक्टर चे नाव कशफ काझी असून तिच्या तीन पिढ्या या क्ष्रेत्रातील आहेत म्हणून ती कायद्यांमध्ये मातब्बर दिसली, वाटली पाहिजे याची दक्षता मी घेतली. स्वतःला वकील समजणे थोडे कठीण होते परंतु मला नेहमी कलाकार म्हणून एक गोष्ट आवडते ती ही की आम्हाला निरनिराळ्या व्यवसायांचे प्रतिनिधित्व करायला मिळते”, श्रेया पिळगावकर ने ‘गिल्टी माईंड्स’ मधील आपल्या भूमिकेबाबत मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा - रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये शिल्पा शेट्टीची भरती, शुटिंगला झाली सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.