ETV Bharat / entertainment

Satish Kaushik Last Show trailer release : सतिश कौशिक यांच्या अखेरची कॉमेडी सीरीज पॉप कौनचा ट्रेलर रिलीज

author img

By

Published : Mar 11, 2023, 6:38 PM IST

Satish Kaushik Last Comedy Show : पॉप कौन या कॉमेडी मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या मालिकेत दिवंगत अभिनेते सतिश कौशिक शेवटच्या वेळी कॉमेडी करताना दिसणार आहेत.

Satish Kaushik Last Show trailer release
सतिश कौशिक यांच्या अखेरची कॉमेडी सीरीज

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेता सतिश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आनंदात मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक हे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हलकासा व्यायाम करत असत. कागज या चित्रपटात ते आपल्याला अखेरचे पाहायला मिळाले होते. मृत्यूच्या अखेरच्यातही काळात ते अभिनय विश्वात सक्रिय होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या शेवटच्या कॉमेडी शो पॉप कौनचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सतीश कौशिकची कॉमिक स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पॉप कौन या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सतीश कौशिक व्यतिरिक्त या मालिकेत कॉमेडीचे दिग्गज स्टार जॉनी लिव्हर, चंकी पांडे, राजपाल यादव आणि सौरभ शुक्ला हे देखील दिसणार आहेत. कुणाल खेमूही या शोमध्ये आहे. ट्रेलरमध्ये सतीश कौशिक यांना पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

पॉप कौनची कथा? - 'पॉप कौन' एका मुलावर आधारित आहे जो आपल्या खऱ्या वडिलांच्या शोधात हताश आणि त्रस्त आहे. कथेत चार वेगवेगळ्या व्यक्ती त्या मुलाचे वडील असल्याचा दावा करताना दिसतात. अशा स्थितीत हा मुलगा पूर्णपणे गोंधळून गेला आहे. वडिलांच्या शोधात त्रस्त झालेल्या या मुलाची भूमिका कुणाल खेमूने साकारली आहे. या मालिकेत सतीश कौशिक देखील वडिलांच्या भूमिकेत आहेत.

मालिका कधी दिसणार? - सोशल मीडियावर पॉप कौनचा ट्रेलर शेअर करून कुणाल खेमूने शेअर केला आणि लिहिले, कॉमेडीचे बादशाह सतीश कौशिक जी यांना माझा सलाम, ज्यांच्या दमदार अभिनयाने आणि दमदार कॉमेडीने आम्हाला शतकानुशतके हसवले. १७ मार्चपासून या मालिकेचे सर्व भाग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळतील.

सतिश कौशिक यांचा अभिनय या मालिकेचा मुख्य आकर्षणाचा पाईंट ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून या मालिकेची तयारी करण्यात ते गुंतले होते. अखेर हा शो प्रदर्शनासाठी सज्ज झाला असताना स्वतः कौशिक या जागात नाहीत याची सल दिग्दर्शक आणि सहकलाकारांना असणार हे निश्चित आहे.

हेही वाचा - Hrithik Roshanhuge Biceps : हृतिक रोशनने शेअर केले त्याच्या मोठ्या बायसेप्सचे न पाहिलेले फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.