मुंबई - टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलला ओळखले जाते. या शोमुळे अनेकांना आपल्या आवाजाने स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाचे पहिले पर्व खूप लोकप्रिय ठरले होते. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पनवेलचा सागर म्हात्रे महाराष्ट्राचा पहिला विजेता ठरला आहे.
‘इंडियन आयडल मराठी’ . या महापर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. काही दिवसांपूर्वी यातील टॉप ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या शोचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला.
इंडियन आयडलच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे स्पर्धक अंतिम फेरीत पोचले होते. त्यातील पनवेलचा सागर म्हात्रेने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सागर म्हात्रे हा सर्व प्रकारची गाणी अत्यंत सफाईने गाताना दिसला. पेशाने इंजिनियर असलेल्या सागरने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्याला तब्बल ८ वेळा त्याला ‘झिंगाट परफॉर्मन्स’ मिळाले आहेत. सागर दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला होता. पहिला ‘इंडियन आयडल मराठी’ ठरलेल्या सागरला अजय अतुल यांच्याकडून ट्रॉफी बहाल करण्यात आली.
हेही वाचा - Akshay Kumar : मला माफ करा! 'त्या' जाहिरातीमधून अभिनेता अक्षय कुमारची माघार