ETV Bharat / entertainment

पंकज त्रिपाठीने केले लडाखमध्ये 'गुलकंदा टेल्स'चे शूटिंग, सांगितला खडतर अनुभव - Gulkanda Tales directed by Rahi Anil Barve

आगामी वेब शो 'गुलकंदा टेल्स' या मालिकेत पंकज त्रिपाठी भूमिका करीत आहे. या मालिकेची निर्मिती राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडी करीत आहे. याचे शुटिंग लडाख येथे सुरू होते. या शुटिंगसाठीचा पंकज त्रिपाठीचा अनुभव अतिशय खडतर होता.

अभिनेता पंकज त्रिपाठी
अभिनेता पंकज त्रिपाठी
author img

By

Published : May 26, 2022, 3:54 PM IST

मुंबई - अभिनेता पंकज त्रिपाठी आगामी वेब शो 'गुलकंदा टेल्स' या मालिकेत काम करीत आहे. या मालिकेची निर्मिती राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडी करीत आहे. याचे शुटिंग लडाख येथे सुरू होते. या शुटिंगसाठीचा पंकज त्रिपाठीचा अनुभव अतिशय खडतर होता.

आपला अनुभव सांगताना, 'मिर्झापूर' अभिनेता म्हणाला, "त्यांना जे दृश्य शूट करायचे होते त्यासाठी एका विशिष्ट पातळीच्या फिटनेसची आवश्यकता होती. आम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी आणि तंदुरुस्त आकारात चालण्यासाठी किंवा कलते उतार आणि खडतर भूप्रदेशांवर धावण्यासाठी प्रशिक्षक नियुक्त केले गेले होते."

"संपूर्ण अनुभव हा साहसी काम करण्यासारखा होता, आणि शारीरिकदृष्ट्या खूप कष्टदायी होता, पण मी संपूर्ण शेड्यूलमधील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटला. या बहुप्रतिक्षित आणि रोमांचक वेब शोच्या प्रसारणाची प्रतीक्षा करा," असे पंकज त्रिपाठी पुढे म्हणाला.

या मालिकेत कुणाल खेमूचीही महत्त्वाची भूमिका आहे. तुंबाड हा पौराणिक भयपट दिग्दर्शित केलेल्या राही अनिल बर्वे यांनी 'गुलकंदा टेल्स'चे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा - करण जोहरच्या वाढदिवसाला बॉलिवूड स्टार्सची जत्रा पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.