मुंबई - मेडिकल ड्रामा असलेल्या मुंबई डायरीज मालिकेच्या आगामी दुसऱ्या सीझनचा ट्रेलर शुक्रवारी लॉन्च करण्यात आला. दुसरा सीझनच्या कथानकाची सुरुवात पहिला सिझन संपला त्या कथानकाच्या काही महिन्यांनंतर सुरू होते. बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना एका दिवसाच्या मुसळधार पावसामुळे नवीन संकटांचा सामना करावा लागतो. या ट्रेलरमध्ये मुंबईच्या संततधार पावसामुळे आलेल्या प्रलयानंतरच्या घटना आणि बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील वैद्यकीय पायाभूत सुविधा - मर्यादित साधनसामग्रीचा मुकाबला करताना सरकारी रुग्णालय कसे हाताळले जातं याचं दर्शन घडणार आहे.
बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील कर्मचार्यांनी त्यांचे वैयक्तिक मुद्दे बाजूला ठेवण्याची गरज आहे. नाततेवाईकांच्या मिळणाऱ्या धमक्या हा एक नव्या डोकी दुखीचा विषय कर्मचाऱ्यंसमोर निर्माण झालाय. भूतकाळातील चुका आणि सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या मालिकेत कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. हे कलाकार आहेत जे पहिल्या सीझनपासून त्यांच्या भूमिका पुन्हा करतात. नवीन सीझनमध्ये परमब्रत चट्टोपाध्याय आणि रिद्धी डोगरा सारख्या नवीन कलाकारांची भर पडणार आहे.
या मालिकेबद्दल बोलताना, डॉक्टर कौशिकची भूमिका साकारणारा मोहित रैना एका निवेदनात म्हणालाकी, 'मुंबई डायरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल मी खूप उत्साही आहे. आतापर्यंतचा हा एक उल्लेखनीय अभिनय प्रवास आहे आणि मला वाटते की या सीझनमध्ये प्रेक्षकांना डॉक्टर कौशिकच्या एका वेगळी बाजूचे दर्शन होईल.'
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा म्हणाली की, ;पुन्हा एकदा मुंबई डायरीच्या सेटवर काम करताना आपल्या घरी आल्यासारखे वाटत होते. निखिल अडवाणी सोबत काम करणे हा नेहमीच आनंददायी अनुभव आहे. प्राइम व्हिडीओ आणि एमे एंटरटेनमेंटने यावेळी दर्जा अधिक उंवला आहे. यातील सर्व पात्रे अतिशय वास्तवादी झाली आहेत. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी आभारी आहे आणि पुढचा सिझन सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.'
मुंबई डायरीज सिझन 2 या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि एमे एंटरटेनमेंटच्या मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केली आहे. मुंबई डायरी सीझन 2 हा मालिका 6 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल.
हेही वाचा -
3. Ranbir Kapoor birthday : पाहा, रणबीर कपूरने घराबाहेर चाहत्यांसोबत कसा साजरा केला वाढदिवस