मुंबई : सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी हाती आली आहे. हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंहचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. 25 व्या वर्षी पवन सिंहनं मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 5 वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, पवन हा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचं मूळ गाव हरिहरपूर आहे. पवन सिंहच्या पार्थिवावर मांड्या इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पवन सिंहचं निधन झाल्यानंतर त्याचे चाहते आणि कर्नाटकातील नेते तसेच अभिनेत्यांकडून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूच्या तपशीलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
पवनच्या मृत्यूवर शोक व्यक्त : मांड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार के बी चंद्रशेखर, माजी मंत्री के सी नारायण गौडा, माजी आमदार बी. प्रकाश, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बी एल देवराजू, काँग्रेस नेते बुकनाकेरे विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी. नागेंद्र कुमार, जेडीएस नेते अक्कीहेब्बालू रघु, राज्य सरचिटणीस बी. युवा जनता दल कुरुबहल्ली नागेश आणि इतर अनेकांनी पवनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. दरम्यान काही दिवसापूर्वी अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता.
दिग्दर्शक इस्माईल यांचे निधन : मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सिद्धीकी इस्माईल यांचे कोची येथे हृदयविकाराने निधन झालं होतं. सिद्धीकी इस्माईल यांनी 'बॉडीगार्ड' या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. त्यामुळे त्यांचा बॉलिवूडमध्येही चांगलाच दबदबा होता.
अभिनेता पुनीत राज कुमार : गेल्यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत राज कुमारचं निधन झालं. पुनीतच्या निधनामुळे देशभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त झाली. अभिनेत्याच्या मृत्यूमुळे धक्का बसला असताना त्याच्या अनेक चाहत्यांचाही जागीच मृत्यू झाला होता.
हेही वाचा-