ETV Bharat / entertainment

हिमांशी खुराणा आणि असीम रियाझचं वेगवेगळ्या धर्मामुळे झाले ब्रेकअप - हिमांशी आणि असीम रियाज यांचा प्रेमभंग

Himanshi and Aseem Riaz break up : बिग बॉस 13 ची लोकप्रिय जोडी हिमांशी खुराणा आणि असीम रियाझ यांच्या ब्रेकअपची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. हिमांशीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपण यापुढे एकत्र राहणार नसल्याचं सांगितलं. एकमेकांच्या धर्माचा आदर करुन आपण विभक्त होत असल्याचं तिनं म्हटलंय.

Himanshi Khurana and Aseem Riaz
हिमांशी आणि असीम रियाज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 10:41 AM IST

मुंबई - Himanshi and Aseem Riaz break up : बिग बॉसच्या घरात जमलेल्या जोड्या घराबाहेर पडल्यानंतरही टिकतात अशी खूप कमी जोडपी आहेत. त्यामध्ये पंजाबी गायिका हिमांशी खुराणा आणि असीम रियाझ हे एक जोडपं होतं. दोघांची जोडी बिग बॉसच्या घरात असताना जमली. याचा आनंद त्यांच्या चाहत्यांनाही झाला. दोघे लग्न कधी करणार याची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना मात्र एका नव्या बातमीनं धक्का बसला आहे. हिमांशी खुराणा आणि असीम रियाझ यांचा संसार मांडण्या आधीच विस्कटला आहे. हिमांशी खुराणाने स्वत: सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आहे.

वेगवेगळ्या धर्मामुळे झाले ब्रेकअप

पंजाबी गायिका हिमांशी खुराणाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "होय, यापुढे आम्ही एकत्र राहणार नाही आहोत, आम्ही जो काळ एकत्र घालवला तो ग्रेट होता पण आता हे सर्व संपुष्टात आले आहे. आमच्या नात्याचा प्रवास ग्रेट होता आणि आता यापुढे आम्ही आमचे जगणे सुरू ठेवणार आहोत. आपआपल्या धर्माचा आदर राखत आम्ही प्रेमाचं बलिदान वेगळ्या धार्मिक कारणासाठी करत आहोत. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही. कृपया आमच्या खासगीपणाचा आदर करा..... हिमांशी."

अशी जमली होती जोडी

हिमांशी आणि असीम रियाजच्या ब्रेकअपच्या बातम्या गेल्या महिन्याभरापासून येणं सुरू झालं होतं. असीम रियाझनं गायिका हिमांशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानं या चर्चांना उधाण आलं होतं. हिमांशी आणि असीम हे जोडपे राहिले नसल्याचं अखेर अशा प्रकारे समोर आलं आहे. त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचं तर हिमांशी आणि असीम 'बिग बॉस 13' च्या घरात पहिल्यांदा भेटले होते आणि दोघेही प्रेमात पडले होते. हिमांशीने तिच्या नऊ वर्षांच्या प्रियकराशी असीमसाठी ब्रेकअप केलं होतं. हिमांशी आणि असीम अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये एकत्र दिसले आहेत.

असीमकडून अद्याप कोणतीही पर्तिक्रिया नाही

हिमांशीनं विभक्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी असीमच्या सोशल मीडिया पोस्टचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यानं ब्रेकअपवर मौन बाळगणं पसंत केलंय. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे एकत्र फोटोही दिसत नाहीत.

हेही वाचा -

1. 'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री

2. बॉबी देओल अभिनीत इराणी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक झाला रिलीज

3. ' द आर्चिज' अतिशय सुंदर कलाकृती : करण जोहर, कतरिनासह सेलेब्रिटींचा अभिप्राय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.