ETV Bharat / entertainment

IMDb Breakout Star Award : फर्जी अभिनेता भुवन अरोरा याला मिळाला IMDb चा ब्रेकआउट स्टार पुरस्कार - भुवन अरोराच्या भूमिकेचे कौतुक

अभिनेता भुवन अरोरा नुकताच फर्जीमध्ये दिसला होता, त्याने केवळ त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली नाहीत तर ब्रेकआउट स्टारच्या IMDb रेटिंगमध्येही अव्वल स्थान पटकावले आहे. या मालिकेत भुवन फिरोजची भूमिका साकारत आहे, जो सनीचा (शाहिद कपूर) गुन्ह्यात भागीदार असतो.

फर्जी अभिनेता भुवन अरोरा
फर्जी अभिनेता भुवन अरोरा
author img

By

Published : Mar 30, 2023, 5:58 PM IST

मुंबई - आयएमडीबी ( IMDb ) ने तरुण अभिनेता भुवन अरोरा याला ब्रेकथ्रू स्टारसाठी स्टारमीटर पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याने अलिकडेच ओटीटीवरील फर्जी या स्ट्रीमिंग मालिकेतील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना चकित केले होते. मालिकेत, भुवन फिरोजची भूमिका साकारली होती.

फर्जीमधील सनीचा मित्र फिरोझ - सनीची (शाहिद कपूरने भूमिका केली होती) गुन्ह्यातील भागीदार आणि सर्वोत्तम मित्र अशी एक महत्त्वाची भूमिका भुवनने साकारली होती. पुरस्काराला उत्तर देताना तो म्हणाला, ज'गभरातील सर्व चाहत्यांचे आणि व्यावसायिकांचे खूप खूप आभार ज्यांनी मला फर्जीमधील माझ्या अभिनयासाठी खूप प्रेम दिले. मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. वैयक्तिक कामगिरीसाठी हे माझे पहिले पारितोषिक आहे, त्यामुळे माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे.' नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी स्ट्रीमिंग मालिकेत, अभिनेता भुवन अरोरा शाहिद कपूरच्या सर्वोत्तम मित्राची भूमिका साकारत आहे आणि त्याच्या भूमिकेसाठी त्याला खूप अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील भूमिकेच्या लांबीवर शंका घेऊन त्याने सुरुवातीला भूमिका नाकारली होती. दिल्लीतील पथनाट्य रंगभूमीवर काम करणाऱ्या या अभिनेत्याला त्याच्या कामाला मिळालेल्या प्रतिसादामुळे साहजिकच आनंद झाला.

भुवन अरोराच्या भूमिकेचे कौतुक - माझ्या वाट्याला येत असलेल्या प्रेमाने मला भारावून टाकले आहे आणि प्रेरित केले आहे. फर्जी या मालिकेमध्ये काम करणे हा एक सुंदर अनुभव होता आणि मला मिळालेल्या कौतुकाने खूप आनंद झाला आहे, असे तो पुढे म्हणाला. के के मेनन आणि विजय सेतुपती अभिनीत फर्जी ही ब्लॅक कॉमेडी मालिका ही भारतीय चलन बनावट करणाऱ्या कलाकाराची कथा आहे. हा शो प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. ही मालिका राज आणि डीके यांच्या D2R फिल्म्सने निर्मित केली आहे आणि 10 फेब्रुवारी रोजी रिलीज झाली आहे.

प्रतिभावान कलाकारांना दिला जातो पुरस्कार - अविस्मरणीय आयएमडीबी स्टार मिटर अवॉर्ड ( IMDb STARmeter Awards ) हे आयएमडीबीच्या अनोख्या रँकिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान भारतीय सेलेब्रिटींच्या टलेंटचा विचार करुन दिले जाते.

हेही वाचा - Parineeti Chopra : परिणीती चोप्राने शेअर केले दिल्लीचे फोटो; यूजर्स विचारतात कुठे आहेत राघव चड्ढा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.