ETV Bharat / entertainment

romantic song Mann Ka Shodhte : संगीतप्रेमींसाठी 'मन का शोधते' हे रोमँटिक गाणं घेऊन आलीय नवोदित गायिका श्रुती राय! - Shruti Rai

संगीत प्रेमींच्या भेटीसाठी मन का शोधते... हे एक रोमँटिक गाणं भेटीस आलं आहे. विशेष म्हणजे अमराठी असलेली गायिका श्रुती राय हिने हे मंत्रमुग्ध करणारे गीत गायले आहे. या गाण्याचा संुदर व्हिडिओ रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 14, 2023, 6:16 PM IST

मुंबई - संगीत जगात सर्वत्र पॉप्युलर आहे. संगीत हे कुठल्याही भाषेपलीकडे जाणारे असून त्यातील ताल कोणालाही ताल धरायला लावतो. संगीताची स्वतःची भाषा आहे आणि त्यामुळे कुठल्याही भाषेतील गाणी ती भाषा न समजणाऱ्या व्यक्तीलाही भावतात आणि हीच संगीताची ताकद आहे. आपल्याकडे संगीतात पारंगत असलेले अनेक कलाकार आहेत जे उत्तम गायक असतात परंतु संधी मिळत नाही. सांगीतिक रियालिटी शोजमध्ये तर इतके टॅलेंट दिसते की आश्चर्य वाटते की भारतातील कानाकोपऱ्यात किती प्रतिभा दडून बसलीय. म्हणूनच उत्तम टॅलेंट ला वेळीच संधी देणे हे संगीतकार आणि म्युझिक कंपन्यांचं कर्तव्य बनतं. त्यामुळेच सध्या असंही बघायला मिळते की संगीतक्षेत्रात
नवनवीन गाणी रसिकांच्या भेटीला येत असतात. अर्थात या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध म्युझिक कंपन्या या टॅलेन्टस चा शोध घेत संधी देतात आणि त्यामुळे संगीतरसिकांना नवीन आवाज परिचित होतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली पिकल म्युझिक कंपनी आणि त्याचे संस्थापक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी नेहमीच नवोदित गायक गायिकांना संधी देत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे, एका नवीन गायिकेच्या आवाजात. महत्वाचं म्हणजे हे गाणं मराठी असून ते गायलंय अमराठी सिंगर श्रुती रायने.

संगीतप्रेमींसाठी 'मन का शोधते' हे रोमँटिक गाणं लॉन्च

मन का शोधते... रोमँटिक गाणं - तसं बघायला गेलं तर चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका श्रेया घोषाल मराठी गाणी देखील गात असते आणि त्या मराठी गाण्यांसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. साहजिकच तिला फॉलो करणारे अनेकजण आहेत, ज्यात नवोदित गायिका देखील आहेत. त्यातीलच एक म्हणजे श्रुती राय. ही एक कॉलेजात शिकणारी युवती असून, एकही मराठीचा शब्द येत नसताना, तिने एक मराठी गाणं आणलं असून ते संगीतप्रेमींना भावेल अशी अपेक्षा ती बाळगून आहे. ‘मन का शोधते...' असे गाण्याचे बोल असून गाणं ऐकल्यावर तिला मराठी येत किंवा समजत नाही यावर विश्वास बसत नाही. अर्थात तिने या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेऊन गाणं गायलं आहे. ती संगीतप्रेमींसाठी 'मन का शोधते' हे रोमँटिक गाणं घेऊन आली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शब्दरचना, सुमधूर गायन आणि मनमोहक संगीत. याचे संमिलन करीत लक्षवेधी सादरीकरण केलंय दिग्दर्शक कैलाश पवार यांनी. त्यांनी गाण्याच्या व्हिडीओला दिलेली फ्रेश ट्रीटमेंट दृश्यमानता वाढविणारी आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

गाण्याला उत्तम प्रतिसाद - फिल्मी संगीत भलेही खूप लोकप्रिय असले तरी गेल्या काही वर्षांत ‘सिंगल्स‘ ना महत्व मिळू लागलाय. गायकांचा आकडा आणि सिनेमातील गाणी याचा ताळेबंद होत नसल्यामुळे अनेक गायक, संगीतकार ई. लोकांनी इंडिपेन्डन्ट म्युझिक ची कल्पना उदयास आणली आणि ती आता उत्तम प्रकारे जोपासली जात आहे. उत्तम प्रॉडक्शन व्हॅल्यू असलेलं 'मन का शोधते...' हे गाणं प्रदर्शित झाल्यावर त्याला सोशल मीडियावर भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळू लागले आहेत. हे गाणं अंबरीश देशपांडे यांनी लिहिलं असून त्याची संगीतरचना केली आहे अमेय मुळे यांनी. श्रुती राय आणि अभिषेक नलावडे यांनी स्वरसाज चढविला असून या गाण्याच्या व्हिडिओत सीमा कुलकर्णी आणि प्रशांत कराड यांच्या नैसर्गिक अभिनयाने त्याला अस्सलता मिळाली आहे. या गाण्यात गायिका श्रुती राय सुद्धा दर्शन देते. या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे मॅक्सवेल फर्नांडीस यांनी आणि गाण्याची कोरिओग्राफी केली आहे प्रमोद कुमार बारी यांनी.

पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेलं 'मन का शोधते...' हे गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Satish Kaushiks Daughter Vanshika : सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाने वाचले भावनिक पत्र; म्हणाली आपण ९० वर्षांनी पुन्हा भेटू...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.