नवी दिल्ली - टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका ( Raju Srivastava suffers heart attack ) आला आहे. राजू यांना राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल ( treatment begins at AIIMS ) करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिममध्ये वर्कआऊट करताना राजूला ह्रदयविकाराचा झटका आला. तो ट्रेडमिलवरून पडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वृत्ताला त्याचा भाऊ आणि पीआर यांनी दुजोरा दिला आहे.
५९ वर्षीय राजू श्रीवास्तव यांना दोन दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
'गजोधर भैय्या' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो देशातील प्रसिद्ध स्टेप-अप कॉमेडियन आहे. तो पहिल्यांदा 'तेजाब' (1988) चित्रपटात दिसला होता. यानंतर राजू मैंने प्यार किया (1989), बाजीगर (1993), आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया (2001) या चित्रपटात खास भूमिकेत दिसला होता आणि शेवटच्या वेळी देशातील नंबर वन कॉमेडियन कपिल शर्मा स्टारर 'फिरंगी' या चित्रपटात दिसला होता.
टीव्ही मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, 1994 मध्ये, तो पहिल्यांदाच दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या टी टाइम मनोरंजन या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. यानंतर राजूने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना खूप हसवले.