सध्या सुरु असलेल्या म्युझिक सिंगल्सची परंपरा पुढे नेत बॉलीवूडचा एक स्वतंत्र संगीत अल्बम प्रकाशित झालाय ज्यात १० जॉनरची १० गाणी असून ती १० म्युझिक व्हिडीओमध्ये चित्रबद्ध झाली आहेत. ‘दिल से दिल तक’ असे नाव असलेल्या या म्युझिक अल्बममधील एकेक गाणे दर शुक्रवारी पुढील १० आठवडे प्रदर्शित होणार आहेत. तसेच या अल्बममधून येणारा नफा कोविडबाधित अनाथ मुलांसाठी ‘मॅजिक बस फाऊंडेशन’च्या माध्यमातून वापरला जाणार आहे. ‘दिल से दिल तक’ हा बॉलीवूडमधील पहिला स्वतंत्र संगीत अल्बम असून त्याद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कलाकार पहिल्यांदाच स्वतंत्र, वेगळे संगीत निर्माण करण्यासाठी एकत्र आले आहेत.
बॉलीवूड आणि लोकप्रिय संगीत यांच्यात एक दुवा ठरण्याच्या उद्दिष्टाने ज्यांना मनोरंजन व क्रीडा गुरु म्हणून संबोधले जाते त्या शैलेंद्र सिंग यांनी एक अद्वितीय असा वेगळ प्रयोग केला आहे. ‘दिल से दिल तक’या अल्बमच्या माध्यमातून ते संगीत व व्हिडीओ दिग्दर्शक झाले असून त्यांनी विविध दहा संगीत प्रकारांमधील दहा गाणी त्यातील प्रत्येकाच्या व्हिडीओसह सादर केली आहेत. भारतातील सर्वोत्तम प्रतिभेचा वापर करत होतकरू व युवा कलाकारांना घेत शैलेंद्र सिंग यांनी आगळा प्रयोग नवीन व्यासपीठावर केला असून त्याद्वारे हा बहुप्रतीक्षित अल्बम २०० कलाकारांच्या सहभागाने चित्रित करण्यात आला आहे. यातील पहिले गाणे ‘झिया’ हे प्रदर्शित झाले असून आता येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी एक पाठोपाठ एक अशी दहा गाणी दहा आठवडे प्रदर्शित होणार आहेत.संगीत आणि व्हीडीओ दिग्दर्शक शैलेंद्र सिंग म्हणतात, “मी स्वतःला अभिव्यक्तीवादी समजतो आणि त्यामुळे मला सतत काही न काही निर्माण करण्याची आस आहे. मी संगीतप्रेमी आहे. आपण चित्रपटांमध्ये जी गाणी पाहतो त्यातील कथाकथन आणि स्वतंत्र संगीतनिर्मिती यांच्यामध्ये एक दरी असल्याचे मला जाणवते. म्हणून मला अशा स्वतंत्र अल्बमची निर्मिती करायची होती. म्हणूनच या अल्बमच्या निर्मितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कलाकारांना मी एकत्र आणले. यातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की आम्ही ‘दिल से दिल तक’मध्ये कमाल केली आहे. “‘प्यार में कभी कभी’ या शैलेंद्र सिंग यांनी निर्मिती केलेल्या पहिल्या चित्रपटाची लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. सर्वाधिक कलाकारांचे पदार्पण चित्रपटातून केल्याबद्दल हा समावेश होता. त्याद्वारे २०० प्रतिभावान कलाकार बॉलीवूडमध्ये दाखल झाले होते. सिरीयल निर्मितीमधील एक निर्माता आणि पर्सेप्ट लिमिटेड, सनबर्न, गेस्टलिस्ट4गुड आणि बॉस एन्टरटेन्मेंट या कंपन्यांचा संस्थापक अशी त्यांची विशेष ओळख आहे. ते मनोरंजन व क्रीडा उद्योगातील एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत २३ स्टार्टअपना जन्म दिला आहे. ते एक सशक्त चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे F?@K Knowsहे पुस्तक बेस्टसेलर ठरले होते आणि त्यांना त्यासाठी नवीन, युवा भारताचा युथ आयकॉन म्हणूनही गौरविले गेले होते.या अल्बममधील गाणी ही देशभरातील अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी चित्रित केली गेली आहेत. हिमाचाल प्रदेश ते स्पिती व्हॅली आणि महाराष्ट्रातील अनेक नवीन ठिकाणी ही चित्रीकरणे झाली आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक रंगबेरंगी व्यक्तिरेखा साकारल्या गेल्या असून निर्मितीमुल्ये अत्यंत उच्च ठेवण्यात आली आहेत. त्याद्वारे ‘दिल से दिल तक’ संगीत क्षेत्रामध्ये सनसनाटी निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. ‘दिल से दिल तक’ची निर्मिती बॉस एन्टरटेन्मेंटची असून शैलेंद्र सिंग हे संगीत आणि व्हिडीओ दिग्दर्शक आहेत. अंजना अंकुर सिंग यांची संगीत रचना या अल्बमला असून अर्षद खान हे छायाचित्रण दिग्दर्शक आहेत. दिनेश माळी यांनी या संगीत व्हिडीओचे संकलन केले आहे.
हेही वाचा - जय बच्चन यांनी खासदारांसाठी आयोजित केले 'दसवी'चे खास स्क्रिनिंग