ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17: 'वीकेंड का वार'च्या बिग बॉसमध्ये आधी राडा, नील भट्ट-विकी जैन, अंकिता लोखंडे-खानजादी एकमेकांशी भिडले - Weekend Ka Vaar

'वीकेंड का वार'च्या अगोदर 'बिग बॉस'च्या घरामध्ये अंकिता लोखंडे, खानझादी, विकी जैन, नील भट्ट आणि इतरांनी जोरादार भांडण केल्यानं खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या लेटेस्ट प्रोमोमध्ये ही झलक पाहायला मिळतेय.

Bigg Boss 17
बिग बॉसमध्ये आधी राडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 4:12 PM IST

मुंबई - सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस 17'हा रिएालिटी शो 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला. पहिल्या एपिसोडपासून हा शो चर्चेत आहे. नव्या सिझनमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, खानझादी, मुनावर फारुकी आणि इतरांसह 17 प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धक सामील झाले आहेत. सुरुवातीला बिग बॉसच्या घरातील हे सर्व सदस्य एकमेकांना ओळखत होते, बिग बॉसच्या घरात एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत होते. मात्र स्पर्धेचं पहिलं नामांकन पार पडलं आणि घरात वावरण्याला नवं वळण मिळालंय. अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि नवीद सोले या सदस्यांना या आठवड्यासाठी चॉपिंग ब्लॉकवर ठेवण्यात आलंय.

अलिकडेच 'बिग बॉस' शोच्या निर्मात्यांनी इन्स्ट्ग्रामवर शोचे अपडेट्स शेअर केलेत. यामध्ये घरातील सदस्यांमधील गरमागरम वाद चव्हाट्यावर आला आहे. एका व्हिडिओमध्ये, अंकिता आणि खानजादी यांच्या उडालेली शाब्दिक चकमक दिसत आहे. तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये नील याचा विक्कीवरील राग उफाळून आल्याचं दिसतंय. दोघांच्यातील फिजिकल फाईटला आवर घालण्यासाठी अखेर अभिषेकला पाऊल टाकावं लागलंय.

'बिग बॉस 17' च्या पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये अभिषेक या वेळी अरुण श्रीकांत मॅशेट्टीसोबत झगडताना दिसतोय. आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसनं अभिषेकला घरातील सहकाऱ्यांबद्दल त्याच्या आक्रमक आणि चिथावणीखोर वागणुकीबद्दल संयम बाळगण्याचा कठोर इशारा दिला होता.

वीकेंडला सलमान खाननं होस्ट केलेला नवीन सीझन अंकिता लोखंडे, विकी जैन, खानझादी, मुनावर फारुकी, रिंकू धवन, अनुराग डोभाल, जिग्ना व्होरा, सनी आर्य उर्फ तहलका भाई आणि अरुण श्रीकांत महाशेट्टी यांच्यासह १७ स्पर्धकांच्या सहभागानं सुरू झाला. सिझनच्या पहिल्या 'वीकेंड का वार'च्या दिवशी कंगना रणौत तिच्या 'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. तिचा तेजस हा सिनेमा 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खानसोबत कंगना रणौतची होणारी भेट आणि त्यांच्यातील चर्चा याकडे सबंध बॉलिवूडचं लक्ष लागून राहणार आहे. कंगना 'तेजस'मध्ये पायलटची भूमिका साकारतेय.

हेही वाचा -

  1. Rajinikanth Wishes Ganapath : रजनीकांतनं 'गणपथ'च्या टीमला दिल्या शुभेच्छा, जॅकी श्रॉफनंही मानलं थलैयवाचं आभार

2. Leke Prabhu Ka Naam Teaser: अरिजित सिंगच्या गाण्यावर सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची जबरदस्त झलक

3. Priyanka Chopra: मिस वर्ल्ड २००० प्रियांकासोबत कोण आहे ही मुलगी? ...बिग बॉस 17 साठी दिल्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.