ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 day 26 highlights: अंकिता लोखंडेनं मन्नारा, मुनावरला 'पॉवर की रेस'मधून बाहेर काढले, नामांकनातून सुटली जिग्ना व्होरा - अंकिता लोखंडेमुळे मुनावर फारुकी दुखावला

Bigg Boss 17 day 26 highlights: बिग बॉसच्या घरात 'पॉवर की रेस टास्क'मध्ये अंकितानं मुनावर आणि मन्नारा चोप्रा आणि इतरांची नावं घेतली. या टास्कमध्ये अंकिता, सना रईस आणि खानजादी यांनी परफॉर्म करताना सत्तेच्या शर्यतीतून दूर केलं. जिग्ना व्होरा ही एकमेव अशी व्यक्ती ठरली जिला या आठवड्याच्या नॉमिनेशनमधून वगळण्यात आलंय.

Bigg Boss 17 day 26 highlights
बिग बॉसच्या घरात पॉवर की रेस टास्क
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 11:41 AM IST

मुंबई - Bigg Boss 17 day 26 highlights: बिग बॉसचा 17 वा सिझन सुरू झाल्यानंतर एपिसोडगणिक शोची लोकप्रियता वाढतेय. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मनोरंजक घटकांचा समावेश आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, ऐश्वर्या शर्मा, अभिषेक कुमार, ईशा मालवीय आणि इतर या स्पर्धकांनी घरात घातलेल्या सळ्या गोंधळानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय.

'पॉवर की रेस' टास्क

बिग बॉस 17 मध्ये देण्यात आलेल्या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या नातेसंबंधांवरही परिणाम झालाय. अंकिता लोखंडे, खानजादी आणि सना रईस खान या तीन महिला स्पर्धकांना त्यांच्या सहकारी स्पर्धकांना 'पॉवर की रेस' मधून काढून टाकण्याची संधी देण्यात आलीय. परिणाम म्हणून त्यांच्या विशेष क्षमता काढून टाकण्यात आल्यात.

तिन्ही मुलींनी अनोखे पोशाख परिधान केले आणि घुंगरूचा आवाज ऐकून त्यांना अ‍ॅक्टिव्हिटी रूममध्ये जावं लागलं आणि डान्स करावा लागला. त्यानंतर, त्यांना तीन निवडक स्पर्धकांवर गुलाल टाकावा लागला आणि त्यांना सत्तेच्या शर्यतीतून दूर करण्यात आलं. सुरुवातीच्या फेरीत अंकिता लोखंडे पहिल्यांदा जाते आणि नंतर तिचे प्रतिस्पर्धी ऐश्वर्या, नील आणि मुनावर यांना स्पर्धेतून काढून टाकते.

अंकिता लोखंडेमुळे मुनावर फारुकी दुखावला

अंकितानं घेतलेल्या या निर्णयामुळे मुनावर फारुकी नाराज झालेला दिसतो. यासाठी तो आपला विरोध दाखवतो त्यामुळे अंकिता आणि त्याच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतं. नंतर आपल्या टोमण्यामुळे दुखावल्याचं अंकिता मान्य करते. सनाने दुसऱ्या फेरीत विकी, ईशा आणि अभिषेक यांना स्पर्धक म्हणून निवडून त्यांचे विशेष अधिकार काढून टाकले. त्यानंतरच्या फेरीत, खानजादीने अनुराग, समर्थ आणि सनी यांना सत्तेच्या शर्यतीतून काढून टाकले.

विकी जैन अंकिता लोखंडेच्या निर्णयांमध्ये फेरफार करत असल्याने बिग बॉसची प्रतिक्रिया

पुढच्या फेरीत कोणी जायचे यावरून तीन मुलींमध्ये वाद झाल्याचं पाह्यला मिळतं. बिग बॉसनं यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना एकत्र परफॉर्म करण्याची सूचना दिली आणि त्यानंतर ज्या स्पर्धकांना शर्यतीतून बाहेर काढू इच्छितात त्यांची नावे सांगायला सांगितलं. यानंतर विकी जैननं अंकिताच्या निर्णयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिग बॉसनं त्याला या कार्यातून काढून टाकलं.

मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडेमध्ये हाणामारी

पुढे जाऊनही गोंधळ थांबला नाही तर अंकितानं मन्नारा चोप्राचा उल्लेख ‘बिनडोक’ म्हणून केला. या विधानामुळे नाराज झालेल्या मन्नारानं "मेरे पास दिमाग है" असे ठणकावून सांगत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर अंकिता म्हणाली : “मन्नारा के पास पॉवर आ भी जाती है तो उसका दिमाग वाले ही उसका उपयोग करेंगे.”

जिग्ना व्होरा ठरली टास्क विनर

एपिसोडमध्ये पुढे रिंकू किंवा जिग्ना यांना शर्यतीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यासाठी मुलींनी खानजादीची निवड केली. अखेरीस जिग्नाला खानजादीनं काढून टाकलं, परिणामी रिंकू सत्तेच्या शर्यतीत विजेती ठरली. बिग बॉसनं पुढील आठवड्यात रिंकूला नामांकनांपासून वाचवले. त्यामुळे अंकिता लोखंडे, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, समर्थ जुरेल, सनी आर्या, अरुण मॅशेटे, अनुराग डोभाल, नवीद सोले आणि मन्नारा चोप्रा यांना आगामी आठवड्यात बाहेर काढण्यासाठी सोडलंय.

सलमान खाननं होस्ट केलेल्या बिग बॉसच्या 17 व्या पर्वाची सुरुवात विविध पार्श्वभूमी असलेल्या 17 स्पर्धकांसह झाली. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार - रविवार रात्री ९ वाजता जिओ सिनेमा किंवा कलर्सवर प्रसारित होतो.

हेही वाचा -

  1. Sunny Leone Missing Girl : बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनीनं केलं होतं आवाहन, 24 तासात लागला मुलीचा शोध

2. Parineeti Chopra Maldives Vacation : परिणीती चोप्रानं मालदीवमधील थ्रोबॅक फोटो केले शेअर; पाहा फोटो

3. Shooting Of Pushpa 2 And Salaar : 'पुष्पा 2', 'सालार' चित्रपटांच्या शूटिंगमुळे रामोजी फिल्मसिटी गजबजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.