ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण 8 व्या पर्वासाठी करण जोहर सज्ज, शेअर केली सेटची झलक - 8 व्या सिझनच्या सेटचा खुलासा

Koffee With Karan 8 : करण जोहरने त्याच्या सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या पर्वांच्या प्रीमियर आधी सेटची झलक शेअर केली आहे. या रंजक शोसाठी सज्ज असल्याचं चाहत्यांना कळवलंय.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण 8 सेटची झलक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 3:23 PM IST

मुंबई - Koffee With Karan 8 : करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण'च्या आठवा सिझनसाठी सज्ज झालाय. येत्या 26 ऑक्टोबर रोजी हा शो लाँच होणार आहे. या शोबद्दलचे कयास बांधले जात असताना करणनं 8 व्या सिझनच्या सेटचा खुलासा करणारा व्हिडिओ शेअर केलाय. या प्रमोशनल व्हिडिओत नवे सोफे आणि कॉफीच्या मगासह शोसाठी सेट सज्ज असल्याचं कळवलंय.

करण जोहर सध्या त्याच्या कारकिर्दीतील एका शीर्ष स्थानवर असून तो यशस्वी टप्पा अनुभवतोय. अलीकडेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत 25 वर्षांचा कालावधी पार करत त्याचं सेलेब्रिशन केलं. त्याची निर्मिती असलेल्या 'शेरशाह' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हे सर्व होत असतानाच त्याच्या 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सिझनला सुरुवात होणार आहे.

बुधवारी, करणने एक पडद्यामागील व्हिडिओ शेअर केला. यामध्ये प्रॉडक्शन टीमने प्रसिद्ध टॉक शोचा सेट तयार करताना केलेल्या कलात्मक आणि सूक्ष्म प्रयत्नांचे प्रदर्शन केले. व्हिडिओमध्ये सुप्रसिद्ध कॉफी वॉल, सिग्नेचर कॉफी मग, विनिंग हॅम्पर आणि शो-संबंधित कोट्स आणि पॉप कल्चर अशा गोष्टींचा समावेश असलेला एक नवीन पांढरा सोफा यांची झलक पाहायला मिळते. व्हिडिओचा समारोप करणच्या आम्ही परत आलोय या घोषणेनं होतो. करणनं पहिल्यांदाच त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत ही झलक शेअर केलीय.

'कॉफी विथ करण'च्या आगामी आठव्या सिझनमध्ये आलिया भट्ट आणि करीना कपूर खान या प्रतिभावान अभिनेत्री दिसणार आहेत. विशेष म्हणजे नात्यानं त्या नणंद भावजय आहेत. याशिवाय बॉलिवूडचं पॉवर कपल, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या उपस्थितीचीही जोरदार चर्चा आहे. सिंघम अगेन चित्रपटाची अभिनेता-दिग्दर्शक जोडी, अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी या शोसाठी आधीच एक भाग शूट केलाय. 'कॉफी विथ करण'चा प्रत्येक सिझन भरपूर टीआरपी मिळवणारा आणि बातम्यांचे मथळे बनवणारा ठरत आलाय. या शोमध्ये सेलेब्रिटींना करण जोहर ज्या प्रकारे प्रश्न विचारतो त्यातून मिळणारी उत्तरं मनोरंजना जगतात खळबळ उडवून देतात, असा आजवरचा अनुभव आहे.

हेही वाचा -

  1. Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा प्रोमो झाला प्रदर्शित; रिलीजच्या पहिल्या दिवशी किती करेल कमाई...

2. Prabhas Wedding : अभिनेता प्रभासला यंदा कर्तव्य आहे... जवळच्या व्यक्तीने दिली बातमी

3. Leo Early Morning Shows : 'लिओ' रिलीजपूर्वी थलपथी विजयच्या चाहत्यांसाठी एक नाही तर दोन वाईट बातम्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.