ETV Bharat / entertainment

new queen of OTT : आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन - आदिती राव हैदरी हे नाव आता सर्वदूर परिचित

ओटीटी प्लॅटफॉर्म आता तरुणाईचा सर्वात आकर्षक एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म बनला आहे. अनेक नवे चित्रपट, मालिका, शो, स्टँडप कॉमेडी आणि स्पोर्ट्स यांची रेलचेल इथे पाहायला मिळते. या सर्वांमध्ये आदिती राव हैदरी हे नाव आता सर्वदूर परिचित झाले आहे. तिच्या नावावर असलेल्या मालिका लक्षात घेता आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन बनली आहे.

Etv Bharat
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
author img

By

Published : Apr 12, 2023, 4:14 PM IST

मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी या माध्यमाने खूप प्रगती केली आहे. खरंतर सुरुवातीला या माध्यमाला फारसं मनावर घेतलं जात नव्हतं. परंतु कोरोना या महामारीमुळे भले संपूर्ण जगाचे नुकसान झाले असेल परंतु त्या काळात ओटीटी माध्यम भरभराटीस आले. कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि जगाची चाके ठप्प झाली. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते आणि मनोरंजनासाठी त्यांनी या माध्यमाचा आसरा घेतला. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे सिनेमे प्रदर्शित होत नव्हते परंतु निर्मात्यांना त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. तेव्हा शक्कल लढविली गेली की चित्रपट डिजिटल माध्यमावर रिलीज केले तर काही प्रमाणात पैसे वळते होतील. तसेच अनेक लॉकडाऊन लागल्यामुळे ओटीटी माध्यम चित्रपटसृष्टीसाठी वरदान ठरले. नंतर ओटीटी जायंट्स स्वतः या माध्यमासाठी चित्रपट आणि सिरीज ची निर्मिती करू लागले. त्यामुळे इथेदेखील एक स्टार सिस्टिम तयार झाली आणि या स्टार सिस्टिम मधील सध्याची ओटीटी क्वीन आहे आदिती राव हैदरी.

आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन

‘ज्युबिली’ सिरीजमध्ये आदिती राव हैदरी - नुकतीच तिची महत्वपूर्ण भूमिका असलेली ‘ज्युबिली’ ही सिरीज प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली असून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. ही मालिका ३०-४०-५० च्या दशकातील सिनेमासृष्टीच्या वर्तुळाभोवती गुंफण्यात आली आहे. त्याकाळी फाळणी नंतर सिनेमाविश्वात काय घडत होतं याचं सविस्तर चित्रण यातून घडते. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित या सिरीज मध्ये प्रसोनजीत चॅटर्जी आणि अपारशक्ती खुराना सोबत आदिती राव हैदरी अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. ती ज्युबिलीमध्ये सुमित्रा कुमारी हे पात्र रंगवीत असून ती एक यशस्वी चित्रपट नायिका आणि स्टुडिओ हाऊस ची मालकीण दाखविली आहे. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातील चित्रपटसृष्टीतील राजकारण आणि अर्थकारण याभोवती कथानक फिरतं. यातील भूमिकेसाठी आदिती राव हैदरी ची भरपूर प्रशंसा केली जात आहे.

आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन

ताजमधील भूमिकेचे कौतुक - काही आठवड्यांपूर्वी आदिती राव हैदरी ची प्रमुख भूमिका असलेली, ताज - डिव्हायडेड बाय ब्लड ही सिरीज झी ५ ओटीटी वर प्रदर्शित झाली. धर्मेंद्र, नासिरुद्दीन शाह, झरीना वहाब, राहुल बोस सारखे मातब्बर कलाकार यात आहेत. नासिरुद्दीन शाह अकबर बादशाहच्या भूमिकेत असून आदिती राव हैदरी अनारकली च्या भूमिकेत आहे. या भव्य दिव्य ऐतिहासिक मालिकेत राजगादीवर बसण्यासाठी फक्त राजघराण्यात जन्म घेणे जरुरी आहे की गादीवर बसण्यासाठी ती व्यक्ती कर्तबगार असली पाहिजे या तत्वावर कारणमीमांसा देत उहापोह करण्यात आला आहे.

आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन

आदिती राव हैदरीची आंतरराष्ट्रीय ओळख - आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर सुद्धा आदिती राव हैदरीने अनेक सिरीज केल्या आहेत. अजीब दास्तान्स आणि हे सिनामिका या सिरीज मध्ये तिने आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. अजीब दास्तान्स ही चार कथांची अँथॉलॉजि असून आदिती राव हैदरी व्यतिरिक्त अनेक दिग्गज कलाकारांनी यात काम केलंय. हे सिनामिका या सिरीज मध्ये अदिती ची जोडी जमलीय दलकर सलमान सोबत. प्रेम, सेपरेशन, डिवोर्स यावर याचे कथानक असून बायको घटस्फोटासाठी नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करते.

आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन

हिरामंडीमध्ये आदिती राव हैदरी - संजय लीला भन्साली नेटफ्लिक्स साठी एक भव्य सिरीज बनवीत आहेत. हिरामंडी असे नाव असलेल्या या सिरीजमध्ये आदिती राव हैदरी महत्वपूर्ण भूमिकेत असून सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, संजीदा शेख यांच्यादेखील त्यात प्रमुख भूमिका असतील. अर्थातच आदिती राव हैदरी ओटीटी ची नक्कीच क्वीन आहे.

आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन
आदिती राव हैदरी बनली ओटीटीची नवीन क्वीन

हेही वाचा - Malaika Arora Trolled : मलायका अरोरा गुरू रंधावासोबतच्या फोटोंसाठी झाली ट्रोल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.