ETV Bharat / entertainment

Guns and Gulab : 'गन्स अँड गुलाब' मालिकेचे अभिनेता दुल्कर सलमानचे मोशन पोस्टर लॉन्च - बंदुकधारी अर्जुन वर्माची ओळख

डी के आणि राज दिग्दर्शित 'गन्स अँड गुलाब ' वेब सिरीजचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात अभिनेता दुल्कर सलमान हटके भूमिकेत हातात बंदुक ताणलेला दिसत आहे. उद्या २ ऑगस्ट रोजी या मालिकेचा बहुप्रतीक्षित ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे.

Guns and Gulab
'गन्स अँड गुलाब ' वेब सिरीजचा नवा टीझर
author img

By

Published : Aug 1, 2023, 2:37 PM IST

मुंबई - आगामी वेब सिरीज 'गन्स अँड गुलाब'च्या निर्मात्यांनी मंगळवारी अभिनेता दुल्कर सलमानचे मोशन पोस्टर लॉन्च केले. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर केले. यातून एका चाणाक्ष, चपळ आणि बुद्धिवान बंदुकधारी अर्जुन वर्माची ओळख करुन दिली आहे. अर्जुन वर्माच्या भूमिकेत दुल्कर सलमान हातात बंदुक धरुन 'खाली हात आये थे, 'खाली हात तो जाना है', असे म्हणत एन्ट्री करताना दिसतो. 'गन्स अँड गुलाब'चा ट्रेलर उद्या २ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असल्याचेही त्यांनी पुढे लिहिलंय.

निर्मात्यांनी मोशन पोस्टर शेअर केल्यानंतर तातडीने चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. अनेकांनी लाल ह्रदयासह फायर इमोजीसचा वर्षाव कमेंट सेक्शनमध्ये सुरू केला आहे. अर्जुन वर्मा आमचा फेव्हरेट कॅरेक्ट होणार असल्याचे एका युजरने लिहिले आहे. आणखी एकाने दुस्करचा लूक बेहद आवडल्याचे म्हटलंय. गन्स अँड गुलाबचा अधिकृत ट्रेलर २ ऑगस्ट रोजी लॉन्च केला जाणार आहे. याची प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली आहे. 'गन्स अँड गुलाब' मालिकेत अतिशय लोकप्रिय आणि प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. या मालिकेत राजकुमार राव, दुल्कर सलमान, आदर्श गौरव , टी जे भानू आणि गुलशन देवय्या यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या मालिकेची कथा गुलाबगंजमध्ये घडते. या ठिकाणी पहिल्या किल पासून ते पहिल्या किस पर्यंत काहीही घडू शकते. टोळीयुद्ध, माफियाांचे राज्य आणि त्यातील रस्सीखेच, प्रेम शोधणारा मेकॅनिक आणि रहस्य लपवण्यासाठी धडपडणारा एक अधिकारी या मालिकेत दिसणार आहे. 'गन्स अँड गुलाब' ही एक जगातील चुकीच्या गोष्टींपासून प्रेरित झालेल्या लोकांची कथा आहे. गुन्हेगारी जगातील निष्पापपणाचे दर्शनही यात घडते. ९० च्या दशकातील रोमान्स एका क्राईम थ्रिलरसह आपल्या समोर उलगडणार आहे. अलीकडेच निर्मात्यांनी या मालिकेचा अधिकृत टीझर लॉन्च केला होता. अनेक थरारक दृष्यांसह राजकुमार राव यात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्यामुळे वेब सिरीजबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा -

१. Rarkpk Box Office Collection Day 4 : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चौथ्या दिवशी ५० कोटींचा टप्पा केला पार...

२. Mrunal Thakur Birthday : छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतरही मृणाल ठाकूर गाजवत आहे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत राज्य....

३. Taapsee Pannu Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला चित्रपट फ्लॉप दिल्यानंतरही तापसी पन्नूने कमविले नाव....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.