ETV Bharat / entertainment

बिग बॉसमधून अभिषेक कुमार बाहेर? तब्बू होस्ट करणार 'वीकेंड का वार' - Abhishek Kumar eviction

Tabu to host Big Boss : 'बिग बॉस 17' मधून अभिषेक कुमारला बाहेर काढण्याचा निर्णय कॅप्टन अंकिता लोखंडेने घेतल्याने घरामध्ये सन्नाटा पसरला आहे. दरम्यान, अभिनेत्री तब्बू शोमध्ये 'वीकेंड का वार'ची होस्ट म्हणून सलमान खानला साथ देण्यासाठी येणार आहे.

Etv Bharat
बिग बॉसमधून अभिषेक कुमार बाहेर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 12:01 PM IST

मुंबई - Tabu to host Big Boss :अभिनेत्री तब्बू 'बिग बॉस 17'मध्ये सलमान खानसोबत येण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोमध्ये ती होस्ट म्हणून स्पर्धकांशी मनोरंजक संवाद साधेल आणि 'वीकेंड का वार' अधिक खास बनवताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात अनेक वेगवान घडामोडी घडताना प्रेक्षक अवाक झाले आहेत. 'बिग बॉस 17' च्या घराची कॅप्टन म्हणून निवड झाल्यानंतर अंकिता लोखंडेने अभिषेक कुमारला बाहेर काढण्याची घोषणा केली.

मोठ्या प्रमाणावर घडलेल्या झटापटीनंतर अभिषेक कुमारने समर्थ जुरेलवर हात उचलला. त्याची ही कृती बिग बॉसच्या घराच्या नियमांच्या विरोधात होती. याचा योग्यावेळी निवाडा होईल, असे बिग बॉसने सांगितले. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या लेटेस्ट प्रोमोमध्ये, बिग बॉसने घराची नवीन कॅप्टन अंकिता लोखंडेला अभिषेकच्या आक्रमक वागणुकीबद्दल निर्णय घेण्यास सांगितले आणि त्याला शोमधून बाहेर काढायचे आहे का हेही ठरवण्यास सांगितले. त्यानंतर अभिषेक कुमारला त्याच्या अपमानास्पद वागणुकीमुळे शोमधून काढून टाकण्यात यावे, असे अंकिताने घोषित केले. या घोषणेनंतर अभिषेकने टीम आणि बिग बॉसला कोणताही कठोर निर्णय घेऊ नये अशी विनंती केली. बिग बॉस सोडण्याची इच्छा नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. विकी जैन आणि मुनावर फारुकी यांनी त्याला मिठी मारली, तर आयेशा खान आणि मन्नारा चोप्रा या निर्णयावर रडल्या.

समर्थ जुरेल आणि विकी जैन हे किचन परिसरात वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून गेममध्ये प्रवेश करण्याच्या त्रुटींबद्दल चर्चा करताना दिसले. समर्थ म्हणाला की, तो शोमध्ये थोडा उशीरा आला आहे आणि सुरुवातीपासूनच घरात नसल्यामुळे लोकांनी त्याला आकसाने नामांकित केले. अभिषेकने ही गोष्ट कोणी पर्सनली घेतली आहे का, याची चौकशी केली. यावरून समर्थ आणि अभिषेक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाने गंभीर वळण घेतले आणि अभिषेक कुमारने जुरेलला थप्पड मारली. या घटनेनंतर बिग बॉसने अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टे यांना कन्फेशन रुममध्ये बोलावले आणि त्यांना याबद्दल विचारणा केली. या तिघांनी अभिषेकच्या वागण्याची निंदा केली आणि तो प्रसिद्धीत राहण्यासाठी वारंवार असे करतो असे सांगितले.

शेवटी बिग बॉसने अंकिताला घराची कॅप्टन झाल्यावर निर्णय घेण्यास सांगितले आणि तिने अभिषेकला घरातून काढून टाकण्याचा आपला निर्णय बिग बॉसला सांगितला. त्यानंतर अभिषेकचा प्रवास इथंच थांबत असल्याची घोषणा बिग बॉसने केली.

हेही वाचा -

  1. अरबाज खान आणि पत्नी शुरा खानचा पाहा व्हिडिओ व्हायरल
  2. हॉलिवूड स्टार ख्रिश्चन क्लेपसरचा दोन मुलींसह विमान अपघातात मृत्यू
  3. देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे अन् दोन चार लोकांमुळे संपू शकत नाही जावेद अख्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.