मुंबई : बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल. मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला. योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी याची देही याची डोळा घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे.
अभिजीत केळकरची निवड : बालगंधर्व यांचा शंकर महाराजांशी असलेला ऋणानुबंध, त्यांनी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी अनुभवली, कसे महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली यांचा उत्कट प्रवास मालिकेत बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आपल्या मालिकांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी चित्तवेधक पात्रांचा उपयोग केला जातो. आता हेच बघाना, योग्ययोगेश्वर जय शंकर या मालिकेत आता उच्च कोटीचे सांगीतिक व्यक्तिमत्व, बालगंधर्व, यांची एन्ट्री होणार आहे. आणि ती भूमिका साकारण्यासाठी अभिजीत केळकरची निवड करण्यात आली आहे.
'अ ड्रीम कम ट्रू' अनुभव : आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिजीत केळकर म्हणाला, जेव्हा मला या भूमिकेची विचारणा झाली, तेव्हा पासून खूप उत्सुकता होती. मला ही भूमिका करायचीच होती त्यामुळे मी होकार दिला. खरंतर माझा विश्वासच बसत नव्हता. मला कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते की मला याबद्दल विचारणा होईल. कारण बालगंधर्व हा चित्रपट करताना कधीतरी, केव्हातरी ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल असे वाटत होते कारण जे वैभव, सर्वार्थाने जे वैभव बालगंधर्व यांनी अनुभवले, निर्माण केले, ज्याचा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना देखील दिला असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व साकारायला मिळणे हे स्वप्नवत आहे, असे मला वाटत आणि ते या मालिकेच्या द्वारे घडले. 'अ ड्रीम कम ट्रू' ही भावना मला सेटवर आल्यावर अनुभवता येत आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आणि उत्सुकता आहे. 'योग्ययोगेश्वर जय शंकर' ही मालिका सोम ते शनि संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर प्रसारित होते. 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.
हेही वाचा : Sidharth Kiara sangeet video : सिद्धार्थ कियाराच्या हळदी, संगीताचा पहिला व्हिडिओ - मल्हारी गाण्यावर धमाका