ETV Bharat / entertainment

Rajya Natya Competition : राज्य नाट्य स्पर्धेत पीपल्स कला मंचने मारली बाजी, 'खेळण्यातील गेम' ला पाच पारितोषिके - Khelnyateel game

सांस्कृतिक क्षेत्रात (cultural field) गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या भाव चांदूर रेल्वे (Chandur Railway) शहरातील पीपल्स कला मंचच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेत (Rajya Natya Competition) सादर करण्यात आलेल्या 'खेळण्यातील गेम' या नाटकाला पाच पारितोषिके मिळाली आहेत.

Rajya Natya Competition
राज्य नाट्य स्पर्धा
author img

By

Published : Nov 7, 2022, 3:39 PM IST

अमरावती: सांस्कृतिक क्षेत्रात (cultural field) गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या भाव चांदूर रेल्वे (Chandur Railway) शहरातील पीपल्स कला मंचच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेत (Rajya Natya Competition) सादर करण्यात आलेल्या 'खेळण्यातील गेम' या नाटकाला पाच पारितोषिके मिळाली आहेत. निर्मिती, दिग्दर्शन, - प्रकाशयोजना, नेपथ्य, अभिनय या गटात रौप्यपदके संस्थेने पटकावली. यामुळे चांदूर रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पीपल्स कला मंचची निर्मिती: कोरोना उद्रेकापूर्वी 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नागपूर येथील सायंटिफिक हॉल येथे पार पडला. १७ व्य राज्य बालनाट्य स्पर्धेत पीपल्स कलामंच तर्फे "खेळण्यातील गेम" हे बालनाट्य सादर केले होते. त्यात या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे कोरोना नंतर बक्षीस समारंभ पुढे ढकलण्यात आला. बक्षीस समारंभ 31 ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी निर्मिती दिग्दर्शन नेपथ्य आणि प्रकाश योजनेची पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनयासाठी रौप्यपदकही ही अंतिम स्पर्धेत प्राप्त झाले होते.

बक्षीस वितरण सोहळा गोव्यात: या स्पर्धेचा बक्षीस वितरण गोवा येथे होणार आहे. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक राऊत असून सिद्धार्थ भोजने मनीषा हटवार, आशिष उल्ले, निलेश मोहोकर, रोहित तिजारे, विजय दवाळे, तेजस लहाने यांनी सादरीकारणासाठी परिश्रम घेतले होते.

सामूहिक प्रयत्न आवश्यक: खेळण्यातील गेम' या नाटकानंतर रंग बघा हे जगण्याचे', 'कार्यकर्ता, ऑनलाइन अशा अनेक नाटकांच्या सादरीकरणासाठी संस्थेने पुरस्कार प्राप्त केले आहेत. नाटकाच्या सादरीकरणासाठी सामूहिक परिश्रम महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या यशाचे सर्वच वाटेकरी आहेत,अशी प्रतिक्रिया विवेक राऊत यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.