ETV Bharat / entertainment

500 Episodes completed : वागले की दुनिया-नई पिढी नये किस्से मालिकेचे ५०० भाग पूर्ण, कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! - सुमीत राघवन

एखाद्द्या मालिकेचे किती भाग पूर्ण होतात, त्यावर त्याची लोकप्रियता अवलंबून असते. सोनी सबवरील 'वागले की - नई पिढी नये किस्से' या विनोदी मालिकेने नुकताच 500 भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. मालिकेचे हे यश साजरे करण्यासाठी त्यातील कलाकारांनी महाराष्ट्राचे सन्माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.

500 episodes of Vagale Ki Duniya Nai pidhi Naay Kisse
वागले की दुनिया-नई पिढी नये किस्से मालिकेचे ५०० भाग पूर्ण
author img

By

Published : Nov 11, 2022, 5:34 PM IST

मुंबई: एखाद्द्या मालिकेचे किती भाग पूर्ण होतात, त्यावर त्याची लोकप्रियता अवलंबून असते. सोनी सबवरील 'वागले की - नई पिढी नये किस्से' या विनोदी मालिकेने नुकताच 500 भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. मालिकेचे हे यश साजरे करण्यासाठी त्यातील कलाकारांनी महाराष्ट्राचे सन्माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सुमीत राघवन, परीवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्तव, चिन्मयी साळवी, शीहान कपाही, शोचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे बिझनेस हेड नीरज व्यास मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपस्थित होते.

संपूर्ण टीमने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली: ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ (Wagle Ki Duniya- Nayi Pidhi Naye Kisse) ही मालिका सामान्‍य मध्‍यमवर्गीय भारतीयाच्‍या दैनंदिन समस्‍यांना विनोदी पद्धतीने सुरेखरित्‍या सादर करते. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि म्हणूनच या मालिकाने 500 एपिसोड्सचा टप्‍पा गाठला आहे. मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आणि त्‍यांच्‍यासोबत सामान्‍य व्‍यक्‍तींचे नेते व प्रतिनिधी म्‍हणून मालिकेच्‍या यशाबाबत सांगितले. हा टप्‍पा साजरा करण्‍यासाठी आठवडाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे, जसे सेटवर पूजा, सेलिब्रेटरी लंच आणि सेटवर केक कापण्‍याचा समारोह. या टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील मलबार हिल येथे त्‍यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा वंगल्‍यावर भेट घेत मोठ्या उत्‍साहात साजरीकरण केले.

यशस्‍वीरित्या 500 एपिसोड्स पूर्ण: महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले, माझे वागळे शब्‍दाशी सखोल नाते आहे, कारण ठाण्‍यातील वागळे इंडस्‍ट्रीयल इस्‍टेटमध्‍ये सामाजिक कार्यकर्ता म्‍हणून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली होती. मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्‍य माणसाच्‍या दैनंदिन संघर्षांना दाखवते. महाराष्‍ट्र राज्‍याचा मुख्‍यमंत्री म्‍हणून मी सामान्‍य माणसाच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती वचनबद्ध आहे. मालिका ‘वागले की दुनिया’ने सामान्‍य माणसाच्‍या जीवनाला सादर करत आणि अनेक सामाजिक समस्‍यांशी संबंधित उपाय दाखवत अद्भुत कामगिरी केली आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेल आणि निर्मात्‍यांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. दैनंदिन मालिका मनोरंजन करण्‍यासोबत उत्तम नैतिक संदेश देखील देत आहेत, ज्‍याचा प्रेक्षकांच्‍या मानसिकतेवर लक्षणीय परिणाम होत आहे, परिणामी उत्तम समाज निर्माण होण्‍यास मदत होईल, म्‍हणूनच मी देखील माझ्या जनतेप्रती वचनबद्ध आहे. यशस्‍वीरित्या 500 एपिसोड्स पूर्ण करण्‍यासाठी मी या मालिकेच्‍या टीमचे अभिनंदन करतो आणि त्‍यांच्‍या भावी प्रयत्‍नांसाठी शुभेच्‍छा देतो.

अद्भुत अनुभव होता: सुमीत राघवन (Sumit Raghvan) ऊर्फ राजेश वागले म्‍हणाले, 500 एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करणे हे आमच्‍या टीमसाठी मोठे यश आहे आणि मी यासारख्‍या मालिकेची निर्मिती करण्‍यासाठी सोनी सब टीम आणि जेडी मजेठिया यांचे आभार मानतो. कलाकार म्‍हणून पडद्यामागे देखील नाते उत्तम असणे गरजेचे असते आणि मी असे सर्वोत्तम सह-कलाकार सोबत असल्‍याने स्‍वत:ला धन्‍य मानतो. मी दररोज त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍यासाठी उत्‍सुक असतो. आम्‍हाला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रींना भेटण्‍याची आणि त्‍यांच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याची सुवर्णसंधी मिळाली. तो अत्‍यंत अद्भुत अनुभव होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.