मुंबई - Zeenat Aman Qurbani story : दिवंगत अभिनेता फिरोझ खान यांनी 80 च्या दशकात 'कुर्बानी' हा गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात झीनत अमान यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. 'कुर्बानी' चित्रपटाच्या सेटवर उशीरा पोहोचल्यानं फिरोझ खान यांनी झीमत अमान यांच्या वेतनात कपात केली होती, असा एक किस्सा झीनत यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. 'आता जर फिरोझ खान असते तर यावर ते मोठ्याने हसले असते', अशी प्रतिक्रिया फरदीन खानने दिली आहे.
दिवंगत दिग्दर्शक फिरोज खान यांनी 'कुर्बानी' सेटवर आपले वेतन कसे कमी केले याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून फिरोजचा मुलगा फरदीन खानने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, "झीनत अमान आंटी, त्यांनी तर आम्हा कुटुंबालाही सोडले नाही. फारतर आम्हाला 25 टक्केचा फॅमिली डिस्काऊंट दिला असेल ( हसणारा इमोजी ). आता जर खान साहब असते तर त्यांना तुमची पोस्ट आवडली असते आणि ते मोठ्याने हसले असते." झीनत अमाननेही त्याची ही स्टोरी हृदयाच्या इमोजीसह पुन्हा शेअर केली आहे. .
![Fardeen Khan Gives Hilarious Reply](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06-01-2024/20443393_abc.jpg)
'कुर्बानी' हा चित्रपट 1980 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन फिरोज खान यांनी केले होते. विनोद खन्ना, झीनत अमान, अमजद खान आणि इतरांसोबत या चित्रपटात फिरोज खान यांनीही काम केले होते. गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या राजेश आणि अमर या दोन मित्रांची गोष्ट या चित्रपटात मध्यवर्ती होती. हा चित्रपट मैत्री, विश्वासघात आणि बदला या विषयांचा शोध घेतो आणि त्या काळात चित्रपट व्यावसायिक पातळीवर खूप यशस्वी ठरला होता.
![Fardeen Khan Gives Hilarious Reply](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06-01-2024/20443393_abc1.jpg)
1986 मध्ये दाक्षिणात्य चित्रपट 'विदुथलाई' रिलीज झाला होता. हा 'कुर्बानी' चित्रपटाचा रिमेक होता आणि त्यात शिवाजी गणेशन, रजनीकांत आणि विष्णुवर्धन यांनी भूमिका केल्या होत्या आणि के विजयन यांनी दिग्दर्शित केले होते.
झीनत अमानने फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर पदार्पण केले होते. ती या माध्यामावर सक्रिय असून सेलेब्रिटींसोबतचे अनेक किस्से, त्यांच्यातील गोपनियता यापासून ते चिंतनशील विचार शेअर करत असते. झीनत अमान आगामी 'बन टिक्की'मध्ये दिसणार आहे. मनीष मल्होत्रा निर्मित, या चित्रपटात शबाना आझमी आणि अभय देओल देखील आहेत.
अभिनेत्री झीनत अमानने 'सत्यम शिवम सुंदरम', 'हरे रामा हरे कृष्णा', 'कुर्बानी', 'धुंद', 'डॉन', 'मनोरंजन' आणि 'यादों की बारात' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनेक अभिनेत्री बोल्ड भूमिका करताना नाक मुरडत होत्या, तेव्हा ती तिच्या काळातील अपारंपरिक भूमिकांसाठी ओळखली जात होती.
हेही वाचा -