मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा नुकताच रिलीज झालेला 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाला दुसरा वीकेंड सर्वोत्तम ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या 10 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाने 5.49 कोटी रुपयांने सुरुवात केली त्यानंतर या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली. मात्र आठवड्याच्या काही दिवसात चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण झाली परंतु त्यानंतर ती स्थिर राहिली. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर कमाईच्या आकड्यात थोडी वाढ दिसून आली.
10 दिवसाचे कलेक्शन : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर बॉक्स ऑफिसमधील 10 दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे. चित्रपटाने 7.02 कोटी रुपयांचा नोंदणीकृत व्यवसाय केला आहे जो 9 व्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा मोठा आहे. 'जरा हटके जरा बचके'च्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शन 37.35 कोटी रुपये होते तर दुसऱ्या आठवड्यात 16.20 कोटी रुपये इतके होते, ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीजच्या 10 दिवसांनंतर देशांतर्गत एकूण 53.55 कोटी रुपये कमाई झाली आहे.
जरा हटके जरा बचके बॉक्स ऑफिसवर कलेक्शन:
दिवस 1 रु 5.49 कोटी
दिवस 2 रु 7.20 कोटी
दिवस 3 रु. 9.90 कोटी
दिवस 5 रु 4.14 कोटी
दिवस 6 रु. 3.87 कोटी
दिवस 7 रु. 3.51 कोटी
दिवस 8 रु. 3.24 कोटी
दिवस 9 रु 5.76 कोटी
दिवस 10 रु 7.02 कोटी
जरा हटके जरा बचके बॉक्स ऑफिस आठवड्यानुसार:
आठवडा 1: ₹ 37.35 कोटी
वीकेंड 2: ₹ 16.20 कोटी
एकूण: ₹ 53.55 कोटी
जरा हटके जरा बचके या चित्रपटाने केली बॉक्स ऑफिसवर धुम : 'जरा हटके जरा बचके'च्या बॉक्स ऑफिस नंबरने संशयितांना चुकीचे सिद्ध केले ज्यांनी विक्की आणि साराच्या चित्रपटाचा व्यवसाय सुमारे 20 कोटी रुपये असेल असे भाकीत केले होते. दिनेश विजन निर्मित चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालत आहे आणि 16 जून रोजी चित्रपट 'आदिपुरुष' रिलीज होईपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्यामुळे आणखी हा चित्रपट किती कमाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
- Mangal Dhillon Death: जुनूनमधून गाजलेले अभिनेते मंगल ढिल्लन काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने प्रकृती होती गंभीर
- खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!
- Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट