ETV Bharat / entertainment

Vijay Varma schools paparazzi : मर्यादा ओलंडणाऱ्या पापाराझीचा विजय वर्माने घेतला क्लास, तमन्नानेही सांगितली खटकणारी गोष्ट - रोमँटिक जोडपे विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया

Vijay Varma schools paparazzi : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया मालिदीवमध्ये सुट्टी घालवल्यानंतर मुंबईला परतले. यावेळी एका पापाराझीने मर्यादा सोडून प्रश्न विचारल्याने विजय वर्मा नाराज झाला आणि त्याला खडे बोल सुनावले.

Vijay Varma schools paparazzi
पापाराझीचा विजय वर्माने घेतला क्लास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 7:56 PM IST

मुंबई - Vijay Varma schools paparazzi बॉलिवूडचे नवे रोमँटिक जोडपे विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाचा प्रणय बहरत चाललाय. लस्ट स्टोरी २ च्या प्रमोशनच्या वेळी दोघांनीही प्रेमप्रकरणावर शिक्का मोर्तब केले होते. आता ही जोडगोळी मालदीवमध्ये प्रेमाचे रंग उधळून मुंबईला परतली आहे. मुंबई विमानतळावर गुरूवारी या जोडप्याचे मायदेशी आगमन झाले. सुट्टी कशी घालवली असे विचारणाऱ्या एका पापाराझीला विजय वर्माने सौम्य शब्दात झापले आहे.

२६ ऑगस्ट रोजी विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया ही जोडी सुट्टीवर जाण्यासाठी मुंबई विमानतळावर एकत्र दाखल झाली होती. गुरुवारी परतताना मात्र दोघे एकटे एकटे बाहेर पडताना दिसले. याचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले आहेत.

पापाराझींनी शेअर केलेल्या एका व्हिडिओत विजय घाईत विमानतळावर कारच्या दिशेने जात असल्याचे दिसतोय. पापाराझींना पाहून त्याने स्मितहास्य केले, त्यावेळी पापाराझीने त्याला विचारले: 'मालदीवमध्ये समुद्रावर मजा करुन आलायस काय?' असा प्रश्न ऐकताच त्याच्या चोहऱ्यावरील भाव बदलले आणि तो निराश झाल्याचे दिसला. त्यानंतर त्याने चढत्या सूरातच पापाराझीची शाळा घेतली आणि म्हणाला: 'तू अशा अशा प्रकारे बोलू शकत नाहीस.'

दरम्यान, तमन्नाने अलिकडेच एका वेबलॉइडला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेम प्रकरणाबद्दलचा खुलासा केला होता. ती म्हणाली की लोक जेव्हा काहीही बोलतात तेव्हा वाईट वाटते आणि विशेषतः जेव्हा ओळखीचे लोक असे बोलतात तेव्हा जास्त त्रास होतो. तमन्ना पुढे म्हणाली की जेव्हा तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याचा विचार केला जातो तेव्हा त्याला कशी मर्यादा घालायची ते चांगले समजते.

पूर्वी अनेकदा तमन्नाला घरचे लोक काय म्हणतील याची चिंता वाटायची. पण आता तिने त्यांनाही सोबत घेतल्यामुळे त्याची आता फिकीर राहिलेली नाही. जवळचे लोकांच्या आजारपणाशिवाय तिला दुसऱ्या कशाचाही त्रास होत नसल्याचे तिने म्हटलंय.

'लस्ट स्टोरीज २'च्या प्रचाराच्या वेळी तिने विजय वर्मासोबतच्या नात्याला दुजोरा दिला होता. त्याच्यासोबत राहणे आनंदी वाटत असल्याचे तिने म्हटले होते. त्यापूर्वी विजयनेही नकळत कबुली दोताना म्हटले होते की, लोकांनी त्याच्या कामाची चर्चा करावी, खासगी आयुष्याची नाही. कामाच्या आघाडीवर तमन्ना भाटियाचा 'जेलर' हा रजनीकांतसोबतचा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला आहे. ती आगामी क्राइम-थ्रिलर मालिका 'आखरी सच'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा -

१. Jawan Advance Booking : 'जवान'चा पहिल्या दिवशी पहिला शो पाहणार ८५ हजार चाहते; अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अफाट प्रतिसाद

२. Anurag Kashyap Sensational Disclosure : सलमानच्या चित्रपटासाठी हटवला गेला 'गँग्स ऑफ वासेपूर', अनुराग कश्यपचा सनसनाटी खुलासा

३. Jawan trailer at Burj Khalifa : शाहरुखच्या 'जवान' ट्रेलरचे बुर्ज खलिफावर लॉन्चिंग, टकलू अवतार पाहण्याचे किंग खानचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.