मुंबई Year Ender 2023 : अभिनेता शाहरुख खानचे पाच वर्षे चित्रपट फ्लॉप गेले होते. 2023 मध्ये 'किंग खान'नं धमाकेदार कमबॅक करुन आपला 'बादशाह' टॅग कायम ठेवला आहे. शाहरुख खानसाठी 2023 उत्तम ठरलं असून तो एकमेव अभिनेता आहे, ज्यानं त्याच्या चित्रपटांमधून सर्वाधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या शर्यतीत शाहरुखनं सलमान खान, रणबीर कपूर, विकी कौशल, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता विजय यांना खूप मागे टाकले आहे. शाहरुखनं 2023 च्या सुरुवातील 'पठाण' या चित्रपटाद्वारे ओपनिंग केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
तीन चित्रपटांमधून किती कमाई केली?
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'पठाण' : 2023 चा 'पठाण' हा शाहरुख खानच्या 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमधील पहिला अॅक्शन चित्रपट होता. 'पठाण'नं 25 जानेवारीला देशातच नव्हे, तर परदेशातही बंपर कमाई केली. या चित्रपटानं देशांतर्गत कलेक्शन 543 कोटी रुपये आणि जगभरात 1050 कोटी रुपये केलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जवान' : शाहरुख खानचा 'जवान' 7 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला, जो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'जवान' हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्यानं देशांतर्गत चित्रपटांमध्ये सर्वाधिक 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन 1148 कोटी रुपये आहे. हा चित्रपट अनेकांना आवडला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' : शाहरुख खानचा वर्षातील शेवटचा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज झाला आणि या चित्रपटानं 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 323.77 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. वर्ष संपण्यापूर्वी शाहरुख खानच्या तीन चित्रपटांच्या कमाईचे कलेक्शन 2521 कोटी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही अभिनेत्यानं एका वर्षात आपल्या चित्रपटातून इतकी कमाई केलेली नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
1. शाहरुख खान
पठाण- 1050 कोटी
जवान-1148 कोटी
डंकी- 323 कोटी (कमाई चालू आहे...)
एकूण- 2521 कोटी
2. रणबीर कपूर
तू झूठी मक्कार - 220 कोटी
अॅनिमल - 886 कोटी
एकूण- 1106 कोटी
3. थलपथी विजय
वारिसु - 300 कोटी
लिओ - 615 कोटी
एकूण- 915 कोटी
4. प्रभास
आदिपुरुष - 353 कोटी
सालार - 550 कोटी (कमाई चालू आहे)
एकूण - 903 कोटी
5. सनी देओल
गदर 2 - 691 कोटी
6. रजनीकांत
जेलर- 650 कोटी
7. सलमान खान
किसी का भाई किसी की जान- 182 कोटी
टायगर 3- 466 कोटी
एकूण- 648 कोटी
8. अक्षय कुमार
सेल्फी - 23.63 कोटी
ओएमजी 2- 221 कोटी
मिशन रानीगंज - 41.58 कोटी
एकूण- 286.21 कोटी
9. विकी कौशल
जरा हटके जरा बचके - 115.89 कोटी
सॅम बहादूर- 116 कोटी
द ग्रेट इंडियन फॅमिली- 5.65
एकूण - 237.65 कोटी
हेही वाचा :