मुंबई - Year ender 2023 : मनोरंजन जगतातील प्रेम प्रकरणांची चर्चा 2023 मध्येही सुरू राहिली आणि अनेक कथित जोडपी लक्षवेधी ठरली. यातील काहींनी आपल्या प्रेमाच्या नात्याला अधिकृत दुदोरा दिला तर अद्याप काही प्रकरणं डेटींगच्या पातळीवर सुरू आहेत. अशाच काही 2023 मधील काही कथित लव्हबर्ड्सवर नजर टाकूयात.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी अद्याप त्यांचे नाते औपचारिकरित्या घोषित केलेले नाही. मात्र त्यांचे नेहमी एकत्र दिसणे त्यांच्या प्रेमप्रकरणाची पुष्टी करण्यासाठी पुरेसे आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे जोडपं यापैकीच एक आहे. या जोडीने अद्याप त्यांचे प्रेम कॅमेर्यावर जाहीर केलेले नाही, परंतु त्यांचे प्रेम प्रकरण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांचे एकत्र सुट्टीवर आणि लंच - डिनर डेटवर जाणे बऱ्याच गोष्टी सांगून जाणारं आहे.
एपी धिल्लन आणि बनिता संधू
इंडो-कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लन आणि अभिनेत्री बनिता संधूचे इंस्टाग्राम फोटो त्यांच्या नात्याबद्दलच्या अंदाजांना चालना देणारं आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांचे एकत्रीत दिसणे, पोस्ट आणि फोटो शेअर करणे यामुळे हे जोडपे लवकरच आपल्या प्रेम प्रकरणाची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
जान्हवी कपूर शिखर पहारिया
श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर गेल्या वर्षी शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर्षी दोघांनी भरपूर वेळ एकत्र घालवला, प्रवास केला आणि आध्यात्मिक सहलींमुळे ते सतत चर्चेत राहिले. माजी मुख्य मंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा शिखर पहारिया नातू आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे नवीन जोडपे नेहमी एकत्र दिसते. गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या पार्टीत दोघे एकमेकांचे चुंबन घेताना दिसल्यानंतर दोघेही चर्चेत आले. याही वर्षी हे जोडपे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी
सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी गेल्या काही दिवसांपासून डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही रेड कार्पेटवर एकत्र स्पॉट झाले होते. अधिकृतपणे त्यांच्या नातेसंबंधाची घोषणा करून त्यांनीएकत्र कॅमेऱ्यांसाठी पोज दिली होती.
प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी
प्रतिक बब्बर या अभिनेत्याला यावेळी पुन्हा एकदा अभिनेत्री प्रिया बॅनर्जीचे प्रेम मिळाले आहे. या जोडप्याने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांचे प्रेम 'इन्स्टाग्राम ऑफिशियल' घोषित केले. प्रियाने अनेक तेलुगू चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली गेल्या काही दिवसापासून सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची चर्चा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, एका फॅशन शोमध्ये नव्याने सिद्धांतच्या पालकांच्या शेजारी बसलेला फोटो काढला होता. पापाराझींनाही या जोडप्याला अनेकदा आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. गोव्यात एकत्र सुट्टी घालवल्यानंतर ते मुंबई विमानतळावरही दिसले होते.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे बऱ्याच दिवसांपासून लव्हबर्ड्स आहेत. ते अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होतात. साऊथमधील या स्टार जोडप्यानं गेल्या वर्षभरात बॉलिवूड पदार्पणासह अनेक कारणांनी लक्ष वेधून घेतलं आहे.
दिशा पटानी आणि अलेक्झांडर अॅलेक्स
दिशा पटानी तिच्या कथित ब्रेकअपनंतर अलेक्झांडर अॅलेक्सला डेट करत असल्याची अफवा आहे. यापूर्वी ती टायगर श्रॉफसोबत सोशल मीडियावर वारंवार एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसायचे. ती अनेकदा अलेक्झांडर अॅलेक्ससोबत डिनर डेटवर दिसली आहे. अलेक्झांडरनेही याआधी सांगितले आहे की दोघे 'फक्त जवळचे मित्र' आहेत. परंतु अद्यापही या जोडप्याने त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही.
हेही वाचा -