हैदराबाद : World cup 2023: यंदाच्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. आजवर एकही सामना न हारता संघ अजिंक्य राहून उंपात्य फेरीत दाखल झालाय. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. मुंबईतील या मेगा-इव्हेंटला उपस्थित राहणाऱ्या तमाम प्रेक्षकांच्या गर्दीत दिग्गज सुपरस्टार रजनीकांत, फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, बिझनेस टायकून नीता अंबानी आणि इतर अनेक नामवंत सेलेब्रिटींचा समावेश असणार आहे. मंगळवारी चेन्नई विमानतळावरून रजनकांतने मुंबईकडे प्रस्थान केले.
विमानतळावर पत्रकारांनी विचारले असता रजनीकांत यांनी सांगितलं की, मी उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी जाातोय. रजनीकांत यांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गोल्डन तिकीट दिलं आहे. बुधवारी सकाळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने नाणेफेकीच्या तीन तास अगोदर नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हा सामना पाहणार आहेत. अल्लू अर्जुनही या पहिल्या उपांत्य सामन्याचा साक्षीदार होईल अशी आमची अपेक्षा आहे."
या अटीतटीच्या सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी माजी इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या युनिसेफचे सदिच्छा दूत म्हणून काम करणारे बेकहॅम सध्या बालहक्क आणि लैंगिक समानतेची वकिली करण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. व्हीव्हीआयपी लाउंजमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा असलेल्या इतर प्रमुख व्यक्तींमध्ये अभिनेता सलमान खान, आमिर खान आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांचाही समावेश आहे.
बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. 2015 आणि 2019 मध्ये खेळल्यानंतर न्यूझिलंडला त्यांचा सलग तिसरा विश्वचषक फायनल जिंकण्याची आशा आहे. तर 2013 पासून विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या भारतीय संघाला विजेतेपदाची संधी चालून आली आहे. भारतीय संघाचे सर्वच खेळाडू उत्तम फॉर्मध्ये असून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल यांच्याकडून आजच्या सामन्यात मोठ्या अपेक्षा आहेत.
हेही वाचा -