मुंबई Amitabh Bacchan News : विश्वचषकमधील अंतिम सामना होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा भारतीय संघ जिंकतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना ऑस्ट्रेलिया-भारत अंतिम सामना पाहू नका, असा सल्ला दिला होता. या चर्चेनंतर अहमदाबादमधील सामन्यात निमंत्रितांच्या यादीत नाव असूनही अमिताभ हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहिले नाहीत. तरीही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी 'बिग बी' यांना ट्रोल केलं.
-
T 4835 - कुछ भी तो नहीं
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 4835 - कुछ भी तो नहीं
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 19, 2023T 4835 - कुछ भी तो नहीं
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 19, 2023
अंतिम सामन्यासाठी बिग बींनी दिल्या होत्या शुभेच्छा- अमिताभ बच्चन हे सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेचं सूत्रसंचालन करतात. भारतीय संघ अंतिम सामना खेळत असताना अमिताभ बच्चन यांनी संघासाठी एक संदेश दिला. त्यांनी रविवारी संदेशात म्हटलं की, भारतीय संघाला १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे. प्रिय रोहित आणि टीम इंडिया, आजच्या दिवसासाठी तुमच्या टीमची वाट काही वर्षांपासून वाट पाहत आहे. त्यासाठी तुम्ही कष्टही केले आहेत. तुमच्यासह संपूर्ण देशानं आजच्या दिवसाची वाट पाहिली. हा संदेशाचा व्हिडिओ केबीसीच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मैदानातील ११ क्रिकेटपटूबरोबर संपूर्ण देशदेखील श्वास घेणार आहे. तुमच्याबरोबर सर्व देशाचा उत्साह ओसंडून वाहणार आहे. जेव्हा तुम्ही विजयी होऊन हातात विश्वचषक घेताल, तेव्हा १४० कोटी भारतीयांकडून विजयी विश्व तिरंगा प्यारा, असा जयजयकार होईल. ऑल दे बेस्ट टीम इंडिया.
-
T 4831 - when i don't watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 4831 - when i don't watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023T 4831 - when i don't watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023
सामना सुरू असताना अमिताभ बच्चन पुन्हा ट्रोल- उपांत्यफेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभूत केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत एक्सवर पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा भारतीय संघ जिंकतो. त्यानंतर काहीच वेळात सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी बिग बी यांना अंतिम सामना पाहू नये, असा सल्ला दिला होता. भारत पराभवाच्या छायेत असताना अमिताभ बच्चन यांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास 'कुछ भी तो नही', असं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यावरून अमिताभ बच्चन यांना पुन्हा ट्रोल करण्यात आलं. तुम्ही मॅच पाहिली म्हणून भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याचं असं काही वापरकर्त्यांनी म्हटलं. अशा रीतीनं क्रिकेटप्रेमींना बिग बीला अंतिम सामना होण्यापूर्वी, सामना सुरू होत असताना आणि सामना झाल्यावर ट्रोल करण्यात आलं.
हेही वाचा-