मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान नेहमी नव्या प्रतिभावान सहकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी ओळखला जातो. तो नवोदितांसाठी प्रेरणास्थानही असतो. मात्र त्याचा संयम यू ट्यूबर भुवन बामने घालवला आहे. प्राइम व्हिडिओने शेअर केलेल्या एका मेजशीर क्लिपमध्ये भुवन बामने लिहिलेली पठाणच्या ओटीटी प्रमोशनची स्क्रिप्ट शाहरुख वाचताना दिसतो. त्याने लिहिलेली स्क्रिप्ट खूपच सुमार वाटते. मग त्याला दुसरे काही तरी करण्यास सांगतो. भुवन पुन्हा नवे डायलॉग शाहरुखला सांगतो. पुन्हा पुन्हा संधी देऊनही शाहरुखला समाधान वाटत नाही आणि तो भुवनवर वैतागतो आणि कॅमेरा रोल करण्यास सांगतो. गंमतीने बनवलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये किंग खान आणि भुवन ओटीटी रिलीज तारखेच्या घोषणेच्या व्हिडिओसाठी लाइन क्रॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
-
nothing, just Pathaan sharing some news with you 💣
— prime video IN (@PrimeVideoIN) March 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
watch #PathaanOnPrime, Mar 22 in Hindi, Tamil and Telugu@iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham #SiddharthAnand @yrf pic.twitter.com/2SM5PDEKbV
">nothing, just Pathaan sharing some news with you 💣
— prime video IN (@PrimeVideoIN) March 21, 2023
watch #PathaanOnPrime, Mar 22 in Hindi, Tamil and Telugu@iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham #SiddharthAnand @yrf pic.twitter.com/2SM5PDEKbVnothing, just Pathaan sharing some news with you 💣
— prime video IN (@PrimeVideoIN) March 21, 2023
watch #PathaanOnPrime, Mar 22 in Hindi, Tamil and Telugu@iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham #SiddharthAnand @yrf pic.twitter.com/2SM5PDEKbV
पठाण हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात काही एडिट केलेले पठाणमधील सीन्सही दाखवले जाणार आहेत. त्यामुळे पठाणच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळी पर्वणी असेल. २२ मार्च रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित होईल.
पठाण 50 दिवसांपासून थिएटरमध्ये यशस्वीपणे चालू आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एसआरकेचे पुनरागमन करणारा स्पाय थ्रिलर आता ओटीटी रिलीजच्या दिशेने जात आहे. शाहरुखची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरातील 8000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे.
यशराज फिल्म्स (YRF) द्वारे निर्मिती केलेल्या पठाण चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आउटफिट एक्स या दहशतवादी गटाला भारतावर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी वनवासातून बाहेर पडलेला टायट्युलर स्पाय पठाण वाचवतो. पठाणच्या प्रचंड यशानंतर यशराज फिल्म्स या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येण्याची शक्यता आहे. शाहरुख आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या मते पठाण 2 मूळ चित्रपटापेक्षा मोठा आणि चांगला असेल.
हेही वाचा - Ranveer Singh Troll : रणवीर सिंगने उचलला कचरा; नेटिझन्स म्हणतात, 'ओव्हर अॅक्टींगचे ५० रुपये कट'