ETV Bharat / entertainment

Kriti Sanon on ideal partner : जोडीदारात काय शोधते क्रिती सेनॉन? प्रभाससोबत डेटिंगच्या चर्चेवर केला खुलासा - क्रिती सेनॉन आणि प्रभास प्रेम प्रकरण

Kriti Sanon on ideal partner : आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमी समजदार राहणाऱ्या क्रिती सेनॉनने ती जोडीदारामध्ये कोणते गुण शोधते याचा खुलासा केला आहे. तिने केलेल्या लेटेस्ट विधानामुळे प्रभाससोबतच्या तिच्या डेटिंगच्या चर्चेला अधिक हवा मिळण्याची शक्यता आहे.

Kriti Sanon on ideal partner
क्रिती सेनॉन आणि प्रभास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 12:17 PM IST

मुंबई - Kriti Sanon on ideal partner : अभिनेत्री क्रिती सेनॉन ही निर्विवादपणे बॉलिवूडची आघाडीची प्रतिभावान नायिका आहे. 'मिमी' या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यावरुन तिनं आपल्यातील अभिनय क्षमता सिद्ध करुन दाखवली होती. नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणारी आणि अभिनयासाठी प्राधान्य देणाऱ्या क्रितीचं नाव बाहुबली स्टार प्रभाससोबत डेटिंगच्या बातम्यांमुळे देखील चर्चेत आहे. अलिकडंच तिनं आपल्या रिलेशनशीपबद्दलचा खुलासा केला आणि आपल्या जोडीदाराकडून ती कोणत्या गुणांची अपेक्षा करते याबद्दलही सांगितलं.

एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत क्रितीने सांगितलं की ती सध्या तरी कुणाशीही अटॅच नाही आणि काही काळापासून तशीच आहे. तिनं प्रांजळपणे शेअर केलं की, ती संभाव्य जोडीदारामध्ये प्रेम, प्रामाणिकपणा, महत्त्वाकांक्षा हे तिला प्रेरणा देणारे गुण असावेत. तिला जोडीदार उंच असावा असे वाटतंय हे सांगण्यातही ती मागे राहिली नाही. तिच्या दृष्टीनं होणारा पार्टनर हा सच्चा आणि अस्सल असावा.

क्रिती सेनॉननं जोडीदार उंच असावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी सूतावरुन स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर पुन्हा एकदा #PraKrti ( हॅशटॅग प्रकृती ) सक्रिय करण्यात आला. प्रभास आणि क्रिती सेनॉनची जोडी 'आदिपुरुष'मध्ये शोभून दिसली होती. प्रभास 6 फुट 2 इंच इतका उंच आहे तर क्रितीची उंची 5 फुट 9 इंच आहे. त्यामुळे क्रितीनं बोलून दाखवलेला निकष प्रभासला डोळ्यासमोर ठेवून असल्याची कुजबुज चाहत्यांमध्ये सुरू झाली. क्रिती साधारणपणे आपल्या रोमँटिक जीवनाविषयी समजूतदार राहिली आहे. एकदा तिची बहिण नूपुरनं सांगितलं होत की ती दोन वेळा रिलेशनशीपमध्ये होती. पैकी यातील एक नातं सर्वात जास्त म्हणजे अडीच वर्षे टिकलं होतं.

व्यावसायिक आघाडीवर क्रिती सेनॉन अलिकडेच ओम राऊतच्या 'आदिपुरुष'मध्ये प्रभास आणि सैफ अली खान यांच्यासोबत दिसली होती. परंतु, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. ती शाहीद कपूरसोबत आगामी चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचं अद्याप शीर्षक ठरलेलं नाही. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. याव्यतिरिक्त क्रिती 'गणपत: भाग एक'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहात आहे. यात तिची टायगर श्रॉफसोबत पुन्हा एकदा जोडी जमणार आहे. यापूर्वी दोघांनी 'हिरोपंथी'मध्ये एकत्र सहकलाकार म्हणून काम केलं होतं.

हेही वाचा -

1. Nitin Gadkari Biopic : रुपेरी पडद्यावर झळकणार ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’चा जीवनप्रवास, ‘गडकरी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

2. Mera Piya Ghar Aaya : माधुरी दीक्षितच्या 'मेरा पिया घर आया' गाण्याचा सनी लिओनीनं बनवला रिमेक

3. Ranveer poses with MS Dhoni : रणवीर सिंगनं 'मेरा माही' म्हणत शेअर केला धोनीसोबतचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.