मुंबई - Uorfi Javed viral video : आपल्या बिनधास्त बोलण्यानं आणि बेफिकीर वागण्यानं, बोल्ड कपड्यांमुळे आणि विचित्र फॅशनमुळे अनेकदा प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री उर्फी जावेदला नुकतीच मुंबई पोलिसांनी अटक केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये उर्फी सकाळी कॉफी पीत असताना दिसत आहे. तिथे काही पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी तिला ताब्यात घेतले. पण हा व्हिडिओ एक प्रँक असल्याचं पुढे सिद्ध झालंय.
उर्फीला खरंच अटक करण्यात आलीय का? - व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला पोलीस उर्फीला तिच्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगत आहे. उर्फीने याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'एवढे छोटे कपडे घालून कोण फिरतं?' उर्फीला पुन्हा कारण जाणून घ्यायचं असताना महिला पोलिसांनी तिला पकडून अटक केली. या व्हिडिओमध्ये उर्फीने डेनिम पँट आणि बॅकलेस रेड टॉप घातला आहे. हा व्हिडिओ एका यूट्यूब वाहिनीनं बनवला असून यातील पोलिसांच्या रुपातील महिला, पोलीस गाडी हे सर्व खोटं आणि नाट्यमय आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बऱ्याच युजर्सना खरा वाटतोय. त्यातील अनेकांनी उर्फीच्या अटकाचा आनंद व्यक्त केलाय. काहींना हा विनोद वाटतोय तर काही जण गांभीर्याने घेत आहेत. दरम्यान, एका युजरने लिहिले की, 'हे एक प्रँक आहे असे वाटते'. एकाने लिहिले, 'बनावट दिसत आहे, पोलिसांपेक्षा उर्फीचा आवाज जास्त येत आहे'. एकाने लिहिले की, 'आता पोलिसांनीही रील बनवायला सुरुवात केली आहे का'. एका यूजरने लिहिलंय की, 'ही प्रँक खरी असती तर बरं झालं असतं'. अशा प्रकारे लोक आपली मतं व्यक्त करत आहेत.
यापूर्वीही केली आहे तक्रार: काही काळापूर्वी उर्फीच्या विरोधात वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तिच्या फॅशन सेन्सबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत उर्फीला विचारले असता तिने ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. असे कपडे घालणारी या इंडस्ट्रीत ती एकटीच नाही, असंही तिनं सांगितले होते. ही आपली खासगी आणि वैयक्तिक निवड असल्याचं तिनं म्हटलं होतं.
हेही वाचा -
2. Bigg Boss 17: मन्नारा चोप्रा बिग बॉसच्या घरात झाली भावूक, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलमध्ये झाला राडा