ETV Bharat / entertainment

Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीला म्हटले सर्वात मौल्यवान खजिना... - शेरशाह चित्रपट

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थने तिचे कौतुक करत तिला आयुष्यातील सर्वात मौल्यवान मालमत्ता असे म्हटले आहे.

Sidharth Malhotra
सिद्धार्थ मल्होत्रा
author img

By

Published : Jul 11, 2023, 7:17 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा त्याच्या लूकमुळे फार चर्चेत असतो. तो नेहमीच पत्नी कियारा अडवाणीचे कौतुक करत असतो. याशिवाय तो पतीचे ध्येय निश्चित करण्यात कधीच कमी पडत नाही. आता सिद्धार्थ हा याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थ हा मुंबईतील एका कार्यक्रमात गेला होता. दरम्यान त्याने या कार्यक्रमात आपली पत्नी कियारा अडवाणीचे वर्णन करतांना तिला मौल्यवान खजिना म्हटले, त्यानंतर यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने केली पत्नीचे कौतुक : पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सिद्धार्थ कियाराला त्याच्या जीवनाचा मौल्यवान खजिना म्हणताना दिसत आहे. याशिवाय तो आता विवाहित जीवनातून काय शिकला, हे देखील त्याने शेअर केले. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थला 'कियारा भाभी'बद्दल प्रश्न विचारला असता तो लालबुंद होताना दिसत आहे. सिद्धार्थने या व्हिडिओत बोलताना, नुकतेच लग्न झाले आहे, मी खूप आनंदी आहे, असे त्याने यावर उत्तर दिले.

लग्नाबद्दल कार्यक्रमात बोलला : लग्नाबद्दल बोलताना त्याने सांगितले, 'लग्न हा एक खेळ आहे. मला समजले की लग्नात 'मी' नसतो. फक्त 'आपण' असतो. तेच जीवन आहे.' सिद्धार्थ नेहमीप्रमाणेच यावेळी देखणा दिसत होता. तो कार्यक्रमात कॅज्युअल लूकमध्ये आला होता. सिद्धार्थने हिरवा टी-शर्ट आणि कार्गो पॅन्टसह तपकिरी कॅज्युअल जाकीट परिधान केली होती. याशिवाय त्याने यावर एक पेंडेंट आणि तपकिरी शूज देखील घातले होते. या लूकमध्ये तो फार खास दिसत होता.

चाहते केला प्रेमाचा वर्षाव : सिद्धार्थ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर सिद्धार्थच्या एका चाहत्याने लिहले, देव तुम्हा दोघांना म्हणजेच सिडकियाराला आशीर्वाद देवो. तर आणखी एका चाहत्याने लिहले, 'माझा सर्वात मौल्यवान खजिना'. 'शेरशाह' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे भेटले. त्यांच्यात आधी चांगली मैत्री झाली, त्यानंतर या मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. तसेच या जोडप्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले.

हेही वाचा :

  1. Stree 2 filming : ' पुन्हा एकदा चंदेरीत पसरला आतंक', स्त्री २ च्या शुटिंगला सुरुवात
  2. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...
  3. Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.