मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा शिव मंदिरात जाताना दिसते. ती शिवाची कट्टर भक्त आहे. तिच्या कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वी ती शिव मंदिरात आपली हजेरी लावते. आता पुन्हा एका सारा शिवाच्या दर्शनासाठी पहाडावर पोहचली. हो खरच, सारा अमरनाथच्या यात्रेला गेली आहे. साराचा अमरनाथ यात्रेमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सारा अली खानच्या चेहऱ्यावर महादेवाच्या दर्शनाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. साराने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. २० जुलै रोजी साराने तिच्या अमरनाथ यात्रेतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये सारा अमरनाथच्या खोऱ्यात हिरवळीवर आराम करताना दिसत होती.
साराने हर हर महादेवचा नारा दिला : सारा अली खान अमरनाथ यात्रेत लाइट स्काय वूलन कॉस्च्युममध्ये दिसत आहे. तसेच तिने डोक्यावर टोपी घातली आहे. यासह तिने खांद्यावर एक बॅग अडकवलेली असून या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. व्हिडिओमध्ये सारा अली खान म्हटले, 'नमस्कार दर्शकांनो, आमच्या अमरनाथ यात्रेकडे बघा, अनेक प्रवासी आले आहेत, अमरनाथची गुहा जी इथून दिसत आहे, तिथे आपण भेट देऊ या धन्यवाद. त्यानंतर तिने हर हर महादेव म्हटले. तसेच साराने याठिकाणचे काही खास दृश्य देखील व्हिडिओत दाखवली आहेत.
साराचा 'जरा हटके जरा बचके' चित्रपट : सारा अली खान तिच्या साध्या स्वभावामुळे चाहत्यांचे मने जिंकते. तसेच साराचा मागील चित्रपट 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला, त्यामुळे ती अमरनाथ यात्रेवर गेली आहे. यापूर्वी देखील ती मध्यप्रदेश मधील कालेश्वर मंदिरात गेली होती. साराला अनेक दिवसांपासून अमरनाथ यात्रेवर जायचे होते. आता शेवटी तिचे अमरनाथ यात्रेला जाणे झाले आहे. 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
हेही वाचा :