ETV Bharat / entertainment

लव्हबर्ड्स सुहाना खान आणि अगस्त्य नंदा न्यू एयर सेलेब्रिशनसाठी अज्ञातस्थळी रवाना - Lovebirds star kids

suhana agastya vacation : आर्चीज चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेले स्टार किड्स सुहाना खान आणि अगस्त्य नंदा हे नवीन वर्षाच्या संभाव्य सुट्टीसाठी रवाना होण्यापूर्वी गुरुवारी सकाळी मुंबईतील खाजगी विमानतळावर दिसले. अगस्त्यसोबत त्याची बहीण नव्या नवेली नंदाही होती.

lovebirds Suhana Khan and Agastya Nanda
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 4:51 PM IST

मुंबई - suhana agastya vacation : सुहाना खान आणि अगस्त्य नंदा हे कथित जोडपे अलिकडेच त्यांचा पहिला चित्रपट द आर्चीजमध्ये झळकले होते. या दोघांनाही गुरुवारी मुंबईतील खासगी विमानतळावर पॅप करण्यात आले. नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी ते अज्ञातस्थळी निघाले असण्याची शक्यता आहे. अगस्त्याची बहीण नव्या नवेली नंदाही तिच्या भावासोबत डिपार्चरमध्ये त्याच्यासोबत होती.

अगस्त्य आणि सुहानाचा एअरपोर्ट लूक - प्रवासासाठी अगस्त्य आणि त्याची बहीण नव्या नवेलीने पांढरा पोशाख निवडला होता. दुसरीकडे, सुहानाने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि मॅचिंग पॅन्ट घातली होती. सुहाना ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी आहे, तर अगस्त्य आणि नव्या ही श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांची मुले आहेत, तसेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नातवंडे आहेत.

द आर्चिज स्टार किड्सच्या पदार्पणाचा चित्रपट - झोया अख्तर दिग्दर्शित सुहाना आणि अगस्त्य यांचा नुकताच प्रदर्शित झालेला नेटफ्लिक्सवरील द आर्चीज चित्रपटाला इंडस्ट्रीतील कलाकारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. द आर्चीज हा एक म्यूझिकल चित्रपट होता. आर्ची (अगस्त्य), वेरोनिका (सुहाना), बेट्टी (खुशी कपूर), जुगहेड (मिहिर आहुजा), रेगी (वेदांग रैना), एथेल (अदिती डॉट) या पात्रांनी रिव्हरडेल या काल्पनिक शहरातील ग्रीन पार्क वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे.

सुहाना मोठी गॉसिप क्वीन - द आर्चीजच्या प्रमोशनल व्हिडिओ दरम्यान, सुहाना आणि अगस्त्याने एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. व्हिज्युअलमध्ये या दोघांनी एकमेकांसाठी मिल्कशेक बनवताना दाखवण्यात आले होते. ते संभाषणात गुंतले असताना अगस्त्याने खुलासा केला होता की सुहाना खूप मोठी गॉसिप क्वीन आहे. "तुम्ही तिला कोणतेही रहस्य सांगू शकत नाही," असे तो म्हणाला होता. प्रत्युत्तरात सुहानाने खेळकरपणे त्याला 'विटी' असे म्हटले होते.

Also read:

  1. बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चित्रपटाच्या कमाईत घसरण
  2. 'सालार'नं सात दिवसात 500 कोटीच्या क्लबमध्ये केला प्रवेश
  3. बॉलिवूडमधील 2023 चे कथित लव्हबर्ड्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.