ETV Bharat / entertainment

Prabhas : 'प्रोजेक्ट के'च्या खऱ्या नावाचा झाला खुलासा ; जाणून घ्या....

'प्रोजेक्ट के'च्या निर्मात्यांनी सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२३ मध्ये चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले. आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे खरे नाव आता समोर आले आहे. प्रभासने पहिल्यांदाच चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

Prabhas
प्रभास
author img

By

Published : Jul 21, 2023, 12:04 PM IST

मुंबई : 'प्रोजेक्ट के' टीम ने शुक्रवारी पहाटे सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) येथे चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित फर्स्ट लुक आणि शीर्षकाचे अनावरण केले आहे. आता प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे खरे नाव समोर आले आहे. प्रभास हा पहिल्यांदाच आता सुप्परहिरो चित्रपटात झळकणार आहे. कार्यक्रमादरम्यान मीडियाशी संवाद साधताना, प्रभासन खुलासा केला की, तो या चित्रपटात एक सुपरहिरो आहे आणि विशेष म्हणजे हे खरोखरच मजेदार आहे, असे त्याने यावेळी सांगितले.

'प्रोजेक्ट के'बद्दल झाला खुलासा : ट्विटरवर एका फॅन पेजद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, 'प्रोजेक्ट के'चे नाव 'कल्की २८९८ एडी'. असे सांगितले आहे. सोशल मीडियावर प्रभासने या चित्रपटाबाबत दिग्दर्शक नाग अश्विन यांचे कौतुक केले आहे. प्रभास सांगितले की, जरी तो सुपरहिरोच्या भूमिकेत चित्रपटात असला तरी त्याच्या पात्राची एक मजेदार बाजू आहे आणि प्रत्यक्षात तो चित्रपटातील एकमेव मजेदार माणूस आहे. असे त्याने म्हटले. ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाची एक छोटीशी झलक बरेच काही सांगून जाणारी आहे. सॅन दिएगो कॉमिक-कॉन या कार्यक्रमात प्रभास, कमल हासन आणि राणा दग्गुबती यांनी आपली उपस्थिती लावली होती. सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२३मध्ये पदार्पण करणारा ‘प्रोजेक्ट के’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहेत, कारण यापूर्वीचा त्याचा आदिपुरुष चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर अतिशय वाईट रित्या फ्लॉप झाला होता.

'कल्की २८९८ एडी' चित्रपटाबद्दल : ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा टीझर १ मिनिट १६ सेकंदाचा आहे. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटामधील व्हिज्युअल खूपच जबरदस्त आहे. हा चित्रपट भविष्यमधील होणाऱ्या घटनावर आधारित असणार आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप मनोरंजक असेल. वैजयंती मूव्हीज निर्मित, 'कल्की २८९८ एडी' ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रभास व्यतिरिक्त, 'कल्की २८९८ एडी' मध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म...
  2. Trial Period web series : जेनेलिया देशमुखच्या 'ट्रायल पीरियड' वेब सिरीजचे २१ जुलै पासून होणार प्रसारण
  3. Good Vibes Only web film : सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली वेबफिल्म, 'गुड वाईब्स ओन्ली'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.