ETV Bharat / entertainment

Prabhas : प्रभास गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून इटलीहून मायदेशी परतला - कल्कि 2898 एडी

Prabhas : साऊथ अभिनेता प्रभास युरोपमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून मायदेशी परतला आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

Prabhas
प्रभास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 4:41 PM IST

मुंबई - Prabhas : साऊथ अभिनेता प्रभास सध्या 'सालार' चित्रपटामुळं चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. दरम्यान प्रभासविषयी एक बातमी समोर येत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. सततच्या कामामुळं त्याची दुखापत आणखीनच वाढली होती. त्यामुळं तो गुडघ्याच्या उपचारासाठी युरोपला गेला होता. तिथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रभास आता भारतात परतला आहे. पापाराझींन विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विमातळावर प्रभास काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये होता. त्यानं चष्मा, टोपी आणि मास्क घातले होते.

'सालार'ची स्टार कास्ट : 'सालार'मध्ये प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांच्यासह अनेक दमदार स्टार्स आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. 'सालार' चित्रपट प्रेक्षकांना 1980 च्या दशकात घेऊन जाणार आहे. चुनखडी माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक मनोरंजक कहाणी या चित्रपटाद्वारे सादर करण्यात आली आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहे, कारण यापूर्वी त्याचा 'आदिपुरुष' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. हा चित्रपट 500 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 143 कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाचं ओम राऊत यांनी दिग्दर्शन केले होत. 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दरम्यान 'सालार' दोन भागात रिलीज करण्याची योजना आहे. पहिल्या भागाचे नाव 'सालार भाग 1 - सीसफायर' आहे.

प्रभास वर्क फ्रंट : प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'सालार' व्यतिरिक्त तो 'कल्कि 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कमल हासन, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटानी, राणा डग्गुबती, गौरव चोपडा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'सालार' हा चित्रपट प्रभासच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे.

हेही वाचा :

  1. Ira Khan pre-wedding ceremony : आमिर खानची मुलगी आयरा खाननं प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो केले शेअर
  2. Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवचा जबाब नोंद, गारुड्यांसमोर होणार चौकशी
  3. Swara Bhasker Diwali : दिवाळीच्या आठवणीत रमली स्वरा भास्कर, शेअर केली उत्सवाची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.