मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अभिषेक अंबरीश आणि अवीवा बिदापा हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. या जोडप्यांच्या लग्नासाठी सिनेक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळीनी हजेरी लावली होती. आता या लग्नातील एक व्हिडिओ सध्याला व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत केजीएफ (KGF) स्टार कन्नड अभिनेता यश हा अभिनेता दर्शनसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यश आणि दर्शन सिंगापूरनल्ली हे राजा कुल्ला या चित्रपटामधील प्रेमा प्रीथी नन्नूसिरु गाताना आणि डान्स करताना दिसत आहेत. पापाराझीने इंस्टाग्राम अकाउंटद्वारे त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
वापरकर्त्यांना आवडला यशचा साधेपणा : व्हिडिओमध्ये यश आणि दर्शन हे स्टेप्स स्टेप्स करताना आणि इतरांना त्यांच्यासोबत सामील होण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच यशने अभिनेत्री रम्या कृष्णनसोबत देखील डान्स केले आहे. यशचा साधेपणा हा त्याच्या चाहत्यांना फार आवडला आहे. या व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात कमेंट आल्या आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली, 'लव्ह यू यश बॉस. इतका नम्र माणूस.' तर दुसर्या युजरने 'केजीएफचा सुलतान,'अशी कमेंट केली आहे. आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, 'विलक्षण डान्स मूव्ह्स. आवडते!' इतर वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर लाल हृदय आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट : यश वर्कफ्रंट बोलायचे झाले तर तो शेवटी ब्लॉकबस्टर हिट केजीएफ चापटर 2 (KGF: Chapter 2) मध्ये दिसला, जो गेल्या वर्षी रिलीज झाला होता. हा कन्नड चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक ठरला आहे. यशने केजीएफ चापटर 2 या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्या बाकी चित्रपटाबद्दल काही उघड केलेला नाही. यशच्या आगामी चित्रपटाची घोषणा जानेवारीत त्याच्या वाढदिवसाला होईल अशी चाहत्यांना अपेक्षा असताना, यशने त्याच्या चाहत्यांना 'संयम आणि समजूतदारपणा'ची भेट मागितली कारण त्याला त्याची घोषणा करण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. यापूर्वी, यश हॉलिवूड प्रोजेक्टवर स्वाक्षरी करत असल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या पण अखेरीस या अफवा आहे असे सांगण्यात आले होते.
हेही वाचा :