ETV Bharat / entertainment

Alia Bhatt jets off to Delhi : आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीला रवाना, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं होणार सन्मान - गंगूबाई काठियावाडी आलिया भट्ट

Alia Bhatt jets off to Delhi : 'गंगूबाई काठियावाडी'मधीलविशेष अभिनयासाठी आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासाठी ती पती रणबीर कपूरसोबत दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाली होती.

Alia Bhatt jets off to Delhi
आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीला रवाना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 10:10 AM IST

मुंबई - Alia Bhatt jets off to Delhi : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आज 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पार पडणार आहे. राजधानीत दिल्लीतील विज्ञान भवनात हा प्रतिष्ठित समारंभ होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. या सोहळ्याला हजर राहण्यासाठी देशभरातील विजेते कलाकार दिल्लीत दाखल होत आहेत. यापूर्वी एसएस राजामौली, एमएम किरवाणी, अल्लु अर्जुन दिल्लीत पोहोचले होते. या सोहळ्यात सामील होण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट नवी दिल्लीला रवाना होत असताना मंगळवारी सकाळी मुंबईतील कलिना विमानतळावर दिसली. 'गंगूबाई काठियावाडी'मधील तिच्या विशेष अभिनयासाठी आलियाला तिच्या पदार्पणाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पती रणबीर कपूरसोबत दिल्लीला जाण्यासाठी ती विमानतळावर दाखल झाली होती.

'गंगूबाई काठियावाडी' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याने आलिया भट्टसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा एक पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. हा प्रतिष्ठित समारंभ दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडणार आहे. देशभरातील मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल.

आलिया जेव्हा कारमधून बाहेर पडली तेव्हा पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात बंद केले. यावेळी तिनं पांढरा ड्रेस परिधान केला होता. तिच्या नॅचरल लूकने आणि स्लीक बन हेअरस्टाइलने ती सुंदर दिसत होती. तिने एक मोठी काळी हँडबॅगही सोबत घेतली होती. आलियानं पापाराझींचे हसतमुखानं स्वागत केलं. तिच्यासोबत असलेल्या रणबीर कपूरनं कॅज्युअल ब्लॅक हुडी घातली होती. विमानतळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या जोडप्यानं पापाराझींसाठी फोटोंना पोज दिल्या.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री क्रिती सॅनॉनलाही 'मिमी' चित्रपटातील भूमिकेसाठी याच श्रेणीत मान्यता मिळाली होती. जेव्हा तिनं ऑगस्टमध्ये हा पुरस्कार परत जिंकला तेव्हा आलियाने तिच्यासोशल मीडियावर दोन फोटोंसह एक मनापासून संदेश शेअर केला होता. यासाठी तिनं गंगूबाईच्या गेटअपमध्ये क्रितीला शुभेच्छा दिल्या होत्या आणि अभिनंदनही केलं होतं.

हेही वाचा -

1. Leo Movie : विजय थलपथीला सुपरस्टार रजनीकांतनं दिल्या 'लिओ' चित्रपटासाठी शुभेच्छा...

2. Hema Malini 75th Birthday: ईशा देओलनं आई हेमा मालिनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटोही केले शेअर...

3. Saif Kareena Wedding Anniversary: करीना कपूरनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस, शेअर केला पतीसोबतचा 'हा' खास फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.