मुंबई - The Vaccine War : विवेक रंजन अग्निहोत्री सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाचं देशभरातून कौतुक होत आहे, तर दुसरीकडे हा चित्रपट जागतिक स्तरावरही जबरदस्त कामगिरी करत आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाला आता ऑस्करच्या लायब्ररीत स्थान मिळालं आहे. माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. अलीकडे, अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीनं 'द व्हॅक्सिन वॉर'च्या पटकथेची प्रत त्याच्या प्रतिष्ठित कोर संग्रहाचा भाग होण्यासाठी मागितली आहे.
'द व्हॅक्सिन वॉर'ला ऑस्कर लायब्ररीत प्रवेश : 'द व्हॅक्सिन वॉर' पटकथेची प्रत लायब्ररी संग्रहातच नाही तर अकादमीचे संशोधन लायब्ररीमध्ये विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी आणि चित्रपटात रस असलेल्या सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' मध्ये नाना पाटेकर, सप्तमी गौडा, रायमा सेन, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारताने ज्या बिकट परिस्थितीत लस तयार केल्या, त्या परिस्थितीची भयावहेची कहाणी सांगतो. पल्लवी जोशी आणि आय ऍम बुद्धा निर्मित, हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. याआधी आमिर खानचा 'लगान', कपिल शर्माचा 'ज्विगातो' यासारख्या चित्रपटानं या लायब्ररीत स्थान मिळाले आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी मानले आभार : 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाला मोठा सन्मान मिळाला आहे. हा चित्रपट डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाबद्दल आदर व्यक्त करतो. त्यांनी महामारीच्या काळात कोविड-19 लस 'कोवॅक्सिन' सात महिन्यांत विकसित केली. विवेक अग्निहोत्रीनं इंस्टाग्रामवर अकादमीकडून मिळालेल्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला अभिमान आहे की 'द व्हॅक्सिन वॉर' सत्य घटनेवर आधारित स्क्रिप्टला लायब्ररीनं 'अकादमी कलेक्शन'मध्ये जागा दिली. Oscars.org मला आनंद आहे की, लोक भारतीय सुपरहीरोची ही महान कथा वाचतील.'
हेही वाचा :
- OMG 2 : 'ओएमजी 2' छोट्या मुलांसाठी बनवल्याचा अक्षय कुमारचा दावा, पण 'ए' सर्टिफिकेमुळे फसला डाव
- Amitabh Bachchan thanks fans : अमिताभ बच्चननं चाहत्यांचं मानलं आभार, म्हणाले, 'प्रेम आणि आपुलकीची ही परतफेड नाही'
- Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामधील फोटो केला शेअर; संधी दिल्याबद्दल दिग्दर्शकाचे मानले आभार...