ETV Bharat / entertainment

Vishu Movie Release : शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणारा ‘विशू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विशू चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. '

Vishu Movie Release
Vishu Movie Release
author img

By

Published : Apr 3, 2022, 3:49 PM IST

मुंबई - गेली अनेक वर्षे, कोरोना संक्रमणाची दोन वर्षे वगळता, मुंबईतील चाकरमानी शिमगा, होळी, गणपती सारख्या सणांना आवर्जून कोंकणात जातो. कोंकणवासीयांसाठी त्यांचा प्रदेश हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया एव्हढाच, किंबहुना काकणभर जास्तच, सरस. याच मातीतील एक कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, ‘विशू’ या चित्रपटातून. ‘ये मालवण कहा आया? यहा दिल में... ‘ असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ 'विशू' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसतेय. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार करणारा आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आरवीच्या येण्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. विशूच्या अस्थिरतेला 'ती'चा किनारा मिळेल? 'विशू' नक्की कोण आहे ? आजवर लपलेले सत्य 'विशू'ला कळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'विशू' पाहिल्यावर मिळणार आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनशैलींचे दर्शन 'विशू'मध्ये घडत आहे. काँक्रीटच्या जंगलात माणूसपण हरवलेले लोक आणि गावात आजही माणुसकी जपणारे, मनापासून पाहुणचार करणारे लोक दिसत आहेत. निळाशार समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि तिथली डौलदार घरे असे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि कर्णमधुर वाटणारी मालवणी भाषा 'विशू'मध्ये पाहायला मिळणार आहे.

गावाशी नाळ जोडणारी कहाणी
'विशू'बद्दल दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणाले, ''शहरात राहूनही आपल्या गावाशी नाळ जोडणाऱ्या तरुणाची ही कहाणी आहे. दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात. तेव्हा त्यांचा प्रवास कोणत्या किनाऱ्यावर येऊन थांबतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तरुणाईलाही हा चित्रपट आवडेल. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम साकारली आहे. गश्मीर आणि मृण्मयी ही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकत आहे. कामानिमित्त मुंबईत आलेला तरुण वर्ग आपल्या गावची भाषा, संस्कृती, राहणीमान विसरत चालला आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावाविषयी ओढ निर्माण होईल.''

गश्मीर महाजनी यांची भूमिका
या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'विशू'चे संवाद, पटकथा हृषिकेश कोळी यांची असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. 'विशू'चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे. श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा - MI Vasantrao : नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘मी वसंतराव' चे ट्रेलर प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.