मुंबई - क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी बुधवारी मुंबईतील त्याच्या रेस्टॉरंटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी खास डिनरचे आयोजन केले होते. हे प्रेमळ जोडपे यजमान या नात्याने नेहमीप्रमाणेच सर्वांचे अतिशय सुंदर आदरातिथ्य करत होते. अनुष्काने पांढऱ्या पँटसह स्लीव्हलेस स्ट्रीप्ड पांढरा शर्ट घातला होता तर विराटने छापील शर्ट परिधान केला होता.
विराटचा मिश्कील आणि उत्स्फुर्त विनोद - हे जोडपे रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींसाठी पोज देत असताना एका पापाराझीने चुकून अनुष्काला 'सर' म्हटले. मग काय ही संधी सोडेल तर तो विराट कोहली कसला. मौके पर छक्का मारण्यात तरबेज असलेल्या विराटने पापाराझीला म्हटले, 'विराट मॅडम भी बोल दे एक बार'. या मिश्कील आणि उत्स्फुर्त बोलण्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पापाराझींच्या या फोटोशूट दरम्यानच्या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कोहली सध्या त्याच्या आयपीएल शेड्यालमध्ये गुंतला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चकडा एक्सप्रेसच्या तयारीत अनुष्का - तो लोकप्रिय फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळतो. दुसरीकडे, रब ने बना दी जोडी फेम अभिनेत्री अनुष्का तिचा भाऊ कर्णेश शर्मा निर्मित चकडा एक्सप्रेस या चित्रपटात झळकणार आहे. क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अनुष्का वेगवान गोलंदाजी करताना दिसेल. झुलन हिने बारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. अतिशय खडतर संघर्ष करुन भारतीय संघात अढळ स्थान तिने निर्माण केले होते. तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि मैदानावरचा पराक्रम चकडा एक्सप्रेसमधून प्रेक्षक पाहतील. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. अनुष्का आणि झुलनचे चाहते रिलीची प्रतीक्षा करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काही दिवसांपूर्वी विराटने पत्नीसोबत एक सुंदर फ्रेम शेअर केली होती. फोटोत विराट एका काळ्या शर्टमध्ये दिसत होता तर अनुष्का शर्मा सुंदर केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधत होती. फोटोंना पोज देताना तिने केस मोकळे सोडले होते.
हेही वाचा - Neha Dhupia : नेहा धुपियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतचे शेअर केले फोटो