मुंबई - ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा आज भारतात आणि परदेशात रिलीज होत आहे. चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात प्रमोशन टीमला यश मिळालंय. चित्रपटाचे रिव्ह्यूदेखीस सकारात्मक आहेत. त्यामुळे या चित्रपटाला गर्दी होणार याची अटकळ निर्मात्यांनी बांधली आहे. जगभरात तब्बल ५६४० स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकणार आहे.
विक्रम वेधा अखेर किती थिएटर्समध्ये दिसणार आहे याचा आकडा प्रसिध्द झाला आहे. यानुसार भारतात हा चित्रपट ४००७ स्क्रिन्सवर तर जगभरातील १०४ देशामध्ये १६३३ स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवशीची कमाई विक्रमी ठरु शकते असा अंदाज चित्रपट विषयक व्यापर विस्लेषकांचा आहे.
-
#Xclusiv... #VikramVedha *final* screen count...
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ #India: 4007
⭐ #Overseas: 1633 [104 countries]
⭐ Worldwide total: 5640 screens pic.twitter.com/oXRRAId2uW
">#Xclusiv... #VikramVedha *final* screen count...
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022
⭐ #India: 4007
⭐ #Overseas: 1633 [104 countries]
⭐ Worldwide total: 5640 screens pic.twitter.com/oXRRAId2uW#Xclusiv... #VikramVedha *final* screen count...
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022
⭐ #India: 4007
⭐ #Overseas: 1633 [104 countries]
⭐ Worldwide total: 5640 screens pic.twitter.com/oXRRAId2uW
22 युरोपियन आणि 27 आफ्रिकन देशांमध्ये रिलीज - तरण आदर्श आणि इतर चित्रपट विश्लेषकांच्या मते, 'विक्रम-वेधा' जगभरातील १०४ देशांतील सिनेमागृहांमध्ये चालेल. रिपोर्ट्सनुसार, 'विक्रम वेधा' उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह युरोपमधील 22 देश आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये रिलीज होणार आहे.
नॉन-पारंपारिक देशांमध्येही प्रदर्शित होणार चित्रपट - याशिवाय रशिया, जपान, इस्रायल आणि लॅटिन अमेरिकन या अपारंपरिक देशांमध्येही (पनामा आणि पेरू) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा पहिल्या चित्रपटाचा विक्रम 'विक्रम-वेधा' साक्षीदार ठरणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा? - 'विक्रम-वेधा' हा तमिळ चित्रपट 'विक्रम-वेधा' (2017) चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. अभिनेता आर. माधवन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, याची कथा चांगले आणि वाईट, काय बरोबर आणि काय चूक यात फरक करायला शिकवते.
सामान्य जनतेतील, वाईट लोकांमध्ये राहून वाईट गोष्टींचा नायनाट करणारी व्यक्ती पोलिसांनाही समजू शकत नाही, हे पाहिल्यानंतर प्रेक्षक संभ्रमात पडतील. चित्रपटाच्या शेवटपर्यंत सामान्य माणसाच्या वेशात ही व्यक्ती पोलिसांना चकमा देऊन आपले टार्गेट पूर्ण करते. शेवटी पोलीस या व्यक्तीला काय बक्षीस देतात, हे चित्रपटात पाहिल्यानंतर कळेल.
हेही वाचा - पाहा दृश्यम 2 टीझर : कुटुंबावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यास विजय साळगावकर सज्ज