हैदराबाद - 'लायगर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याची फी निर्मात्याला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. लायगर 25 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने याची निर्मिती केली होती.
२५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विजयने बॉक्सरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात विजयच्या सोबत मुख्य अभिनेत्री अनन्या पांडे होती. चित्रपटाची हाईप वाढवण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर माइक टायसनलाही महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती, तरीही चित्रपटाची जादू चाहत्यांवर चालली नाही.
मीडियावर विश्वास ठेवला तर, लायगर बॉक्स ऑफिसवर आपत्ती ठरला आहे आणि विजयने चित्रपटासाठी घेतलेली संपूर्ण फी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटासाठी विजयला 6 कोटी मिळाले होते. या चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर होते. चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मात्याने चित्रपटाच्या प्रमोशनवर देखील मोठी रक्कम खर्च केली होती. प्रमोशन दरम्यान, विजय आणि अनन्याने अनेक राज्यांतील शहरांमध्ये चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. विजयने साऊथच्या चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर विजयला 'लायगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला.
हेही वाचा - Salman Khan Video Viral सलमान खान लपवाछपवी व्हिडिओ व्हायरल