मुंबई - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 हा जोरदारपणे साजरा होत आहे. हा फेस्टिव्हल 16 मे रोजी सुरू झाला आणि या कार्यक्रमाची समाप्ती ही 27 मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमात हॉलिवूडपासून तर बॉलिवूड पर्यंतचे आणि जगभरातील अनेक स्टार आले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. सध्या असाच एक फोटो दिग्दर्शक विघ्नेश शिवनने त्याच्या इंन्टाग्राम अकाउंटवर सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोत विघ्नेश हा हॉलीवूड स्टार टोबे मैग्वायरसोबत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 : विघ्नेशने त्याच्या पोस्टवर कॅप्शन देत लिहले, कान्सच्या जागतिक प्रीमियरमध्ये तुमचा मैत्रीपूर्ण शेजारी स्पायडर-मॅन'सोबत असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये, दोघे ही काळ्या सूटमध्ये आहेत. शिवाय फोटोमध्ये दोघे हसत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे. एकानी लिहले, 'प्रत्येक 90 च्या मुलांचे स्वप्न आमच्या बालपणीच्या नायकांसोबत सेल्फी घेण्याचे स्वप्न होते' तर दुसर्याने कमेंट केली, 'संपूर्ण अमेरिकन पापाराझी माझ्या माणसाला घाबरले आहेत आणि तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढलात? असो, हे तुमच्या आयुष्यात एकदाच घडलेले स्वप्न असावे.' अशा निरनिरळ्या प्रकारच्या कमेंट आल्या आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनुराग कश्यपने विघ्नेश आणि प्रदीप रंगनाथन शेअर केला फोटो : काही क्षणांनंतर, अनुराग कश्यपने विघ्नेश आणि प्रदीप रंगनाथन यांच्यासोबत कान्समधील फोटो देखील शेअर केले. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कसे तरी आम्ही इथे भेटतो..आणि मी.. यावेळी प्रदीप रंगनाथन या आश्चर्यकारक मुलासोबतच्या पहिल्या प्रवासात सामील झालो. सिनेमा पाहणे, बोलणे आणि खाणे.' लिहून इंन्टाग्राम स्टोरीजवर, विघ्नेशने अनुरागची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'प्रतिभासोबत!' या तिघांचा एकत्र फोटो शेअर करत लिहिले, 'माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी दोन! आणि काही चांगले क्रेझी कलाकार.' दरम्यान, विघ्नेश आणि प्रदीप रंगनाथन यांनी त्यांच्या पुढील तमिळ रॉम-कॉम चित्रपटासाठी सहकार्य केले आहे, ज्याचे नाव एलआयसी (LIC) असण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, अनुराग कश्यप त्याचा थ्रिलर चित्रपट 'केनेडी' हा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023मध्ये मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रदर्शित करेल. या चित्रपटात राहुल भट मुख्य भूमिकेत आहेत आणि सनी लिओन, आमिर दळवी आणि अभिलाष थापलियाल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
हेही वाचा : Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा विराट कोहलीला पापाराझींनी केल मुंबईत विमानतळावर स्पॉट