मुंबई - 12th Fail' sent for Oscars : विधू विनोद चोप्रांनी दिग्दर्शित केलेला विक्रांत मॅसी स्टारर चित्रपट 'ट्वेल्थ फेल' हा 96व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाशी संबंधित एक खास खुलासा करण्यात आला आहे. विक्रांत मॅसीचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरला. 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 29 दिवस झाले आहेत. आता एका इव्हेंटमध्ये, विक्रांत मॅसीनं हा खुलासा केला आहे की, निर्मात्यांनी 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटाला 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवले आहे.
विक्रांत मॅसीच्या अभिनयाची सुरुवात : या इव्हेंटमध्ये विक्रांतनं त्याच्या संघर्षाबद्दल बोलून त्याच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. त्यानं सांगितलं की, तो वयाच्या 15व्या वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. पुढं त्यानं सांगितलं की, त्याला अभ्यास सोडून काम करण्यास प्रोत्साहित केले गेले होते . तो त्यांच्या वडिलांवर ओझे बनू इच्छित नव्हता. विक्रांतनं आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्हीपासून केली होती. तो एक चांगला डान्सरही आहे. त्यानं अनेक वेळा स्टेजवर डान्स शो केले आहेत. विक्रांतनं अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'ट्वेल्थ फेल' फेलचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट : 'ट्वेल्थ फेल'फेल हा चित्रपट सध्या रिलीजच्या 30 व्या दिवसात आहे. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 45.13 कोटी रुपये आणि जगभरात 55.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाची कहाणी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या शैक्षणिक प्रवासावर आधारित आहे, जे पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात आणि कठीण असलेल्या युपीएससी स्पर्धा परीक्षा देतात. या चित्रपटात अभिनेत्री मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या संख्येनं जात आहे.
हेही वाचा :