ऋषिकेश, उत्तराखंड - अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी उत्तराखंडमधील मसूरी येथे काही दिवसापासून होता. चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर अभिनेता विकी कौशलने ऋषिकेशला जाऊन गंगेत स्नान केले. बुधवारी, विकीने इंस्टाग्रामवर हात जोडून प्रार्थना करीत असलेला आणि डोळे मिटून नदीतून बाहेर पडतानाचा एक आध्यात्मिक व्हिडिओ शेअर केला. राघव जुयालचे 'हर हर भोले नमः शिवाय' हे गाणे व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये वाजताना ऐकू येते. विकीने या व्हिडिओ क्लिपला "हर हर गंगे. ऋषिकेश," असे कॅप्शन दिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकीच्या पोस्टने अनेकांची मनं जिंकली आहेत. क्लिपवर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया वापरकर्त्याने "इतकी सुंदर क्लिप" अशी प्रतिक्रिया दिली. एका नेटिझनने लिहिले "विकी तू खूप हॉट आहेस," तर "ओह माय गॉड! फिटनेस गोल," असे आणखी एकाने लिहिले. विकीने कोणत्या चित्रपटासाठी मसुरीला भेट दिली हे अद्याप कळलेले नाही.