ETV Bharat / entertainment

Very similar tragedy:टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनची टायटन सबमर्सिबल शोकांतिकेवर प्रतिक्रिया - टायटॅनिक

ज्येष्ठ चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनी टायटन पाणबुडीच्या नुकसानीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की टायटन पाणबुडी आणि टायटॅनिक जहाज यांचे नेमक्या त्याच ठिकाणी झालेला अपघातात आश्चर्यकारक साम्य आहे. अपघाताच्या समानतेमुळे कॅमेरॉन यांना धक्का बसला आहे.

Very similar tragedy
जेम्स कॅमेरॉनची टायटन सबमर्सिबल शोकांतिकेवर प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 23, 2023, 1:58 PM IST

लॉस एंजेलिस - जगातील सर्वात श्रीमंत लोक जगप्रवासासाठी निघालेल्या टायटॅनिक या बोटीचा अपघात १५ एप्रिल २०१२ रोजी झाला होता. हे जहाज इंग्लंडमधून न्यूयॉर्क शहराकडे अटलांटिक महासागरातून जात असताना रात्रीच्यावेळी हिमखंडावर थडकले आणि प्रवासी आणि बोटीवर काम करणारे मिळून १५०० लोकांना जलसमाधी मिळाली. या सत्यघटनेवर आधारित निर्माते दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी १९९७ मध्ये टायटॅनिक हा चित्रपट बनवला होता. समुद्राच्या तळाशी असलेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी टायटन नामक पाणबुडीतून पर्यटक म्हणून गेलेल्यांनाही जलसमाधी मिळाली आहे. टायटॅनिक जहाज आणि टायटन पाणबुडी दोन्हींच्या अपघातातील साम्य पाहून दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांना धक्का बसला आहे.

'तुमच्यापैकी अनेकांनी समाजातील आघाडीच्या प्रतिष्टीतांनी ओळखले होते, त्यांनी कंपनीला पत्रे लिहून सांगितले होते की, ते प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जे काही करत आहेत ते खूप प्रायोगिक आहे आणि त्यांना ते प्रमाणित करणे आवश्यक होते. टायटॅनिक आपत्तीचा विचार करता, कॅप्टनला त्याच्या जहाजाच्या पुढे असलेल्या बर्फाविषयी वारंवार चेतावणी देण्यात आली होती आणि तरीही तो एका चंद्रहीन रात्री बर्फाच्या सागरात पूर्ण वेगाने घुसला आणि परिणामी बरेच लोक मरण पावले', असे कॅमेरॉन यांनी ABC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

टायटॅनिकच्या अवशेष स्थळाला भेट देण्यासाठी स्वतः ३३ वेळा खोल समुद्रात डुबकी मारून आलेल्या चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनी १०० वर्षांनंतर त्याच ठिकाणी अशीच घटना घडल्याचे सांगितले. 'अगदी साम्य अशलेली शोकांतिका घडली, जिथे दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, नेमक्या त्याच अचूक जागेवर सर्व जगभरात चालू असलेल्या डायव्हिंगसह घडणे, मला वाटते की हे फक्त आश्चर्यकारक आहे. हे खरोखरच अवास्तव आहे', असे कॅमेरॉन पुढे म्हणाले.

गुरुवारी, बचाव पथकांना टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्याच्या जागेजवळ सबमर्सिबलचे बाह्य भाग सापडले. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट या कंपनीने सांगितले की, 5 प्रवासी मरण पावले आहेत. टायटन या पाच प्रवासी असलेल्या पाणबुडीचा अपघात नेमक कसा घडला याचा तपशील अद्याप हाती लागलेला नाही.

हेही वाचा -

१. Adipurush Box Office Collection: 'आदिपुरुष' चित्रपटाला मिळाला नाही दिलासा , देशांतर्गत पहिल्या आठवड्यात २६० कोटींची कमाई

२. Bigg Boss Ott 2: पूजा भट्टने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल केले स्फोटक खुलासे

३. Srk Daughter Suhana Khan : शाहरुखची पोरगी सुहाना खानने 'शेतकरी' म्हणून खरेदी केली अलिबागमध्ये जमीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.