ETV Bharat / entertainment

जेनेलियाच्या प्रेमात वेडा झालेल्या रितेश देशमुखच्या 'वेड'चा टीझर रिलीज - रितेश देशमुख दिग्दर्शित वेड

रितेश देशमुखने दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले असून त्याने वेड हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचा टीझर अक्षय कुमारने शेअर केला आहे. प्रेमात वेडा झालेल्या तरुणाची भूमिका रितेश साकारत असून या चित्रपटातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करत आहे.

'वेड'चा टीझर रिलीज
'वेड'चा टीझर रिलीज
author img

By

Published : Nov 24, 2022, 3:42 PM IST

बॉलिवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या रितेश देशमुखने दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले आणि वेड हा चित्रपट अस्तित्वात आला. रितेश आणि अक्षय कुमार यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच आपल्या वेडचे टिझर त्याने अक्षय कुमारला पाठविले आणि त्याला ते एवढे आवडले की त्याने लगेचच आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून तो शेअर केला. उत्कंठावर्धक 'वेड' लावणारा टिझर असे म्हणत नेटकऱ्यांचा त्याला उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहिली जातेय.

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वेड' या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनिलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. या पूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. रसिक प्रेक्षकांमध्ये या टिझर द्वारे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

'वेड'चा टीझर रिलीज
'वेड'चा टीझर रिलीज

आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर गीते अजय - अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे. संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत आणि जेनेलिया देशमुख ने वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे .

'वेड'चा टीझर रिलीज

मुंबई फिल्म कंपनी ने आज या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा - रितेशचे दिग्दर्शन पदार्पण आणि जेनेलियाच्या मराठी पदार्पणाच्या 'वेड' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.