ETV Bharat / entertainment

VD13 launched :मृणाल ठाकूरसोबत विजय देवरकोंडाची केमेस्ट्री पाहण्यास चाहते उत्सुक - मृणाल ठाकूर

विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेला आगामी तेलुगू चित्रपट बुधवारी हैदराबादमध्ये लाँच झाला. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक VD13 असे ठरले आहे. विजय देवराकोंडासोबत काम करण्यास ती खूप उत्सुक झाली आहे.

VD13 launched
मृणाल ठाकूरसोबत विजय देवरकोंडाची केमेस्ट्री
author img

By

Published : Jun 14, 2023, 6:49 PM IST

हैदराबाद - साऊथ स्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांचा आगामी तेलुगू चित्रपट बुधवारी येथे अधिकृतपणे लाँच झाला. परशुराम पेटला दिग्दर्शित हा आगामी चित्रपट दिल राजूच्या बॅनरखाली निर्माण होत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ज्याचे नाव तात्पुरते VD13 असे ठरले आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भव्य मुहूर्त समारंभ आयोजित केला होता ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार आणि क्रू सदस्य उपस्थित होते. सोशल मीडियावर निर्मात्यांनी VD13 लाँच इव्हेंटमधील फोटोंची मालिका शेअर केली. मृणालनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या लॉन्चबद्दलचा उत्साह शेअर केला आहे.

सीता रामम या गाजलेल्या चित्रपटाची अभिनेत्री राहिलेल्या मृणालने असेही सांगितले की विजय आणि श्री वेंकटेश्वर क्रिएशन्ससोबत काम करण्यासाठी मी रोमांचित आहे. VD13 मुहूर्त समारंभातील फोटोंची स्ट्रिंग शेअर करताना, मृणालने लिहिले, 'एक अतिशय रोमांचक प्रवासातील पहिले पाऊल... श्री वेंकटेश्वर क्रिएशन्ससोबत काम करण्याची ही माझी पहिली वेळ आहे आणि विजय देवराकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. शूट सुरू होण्यासाठी उतावीळ झाले आहे.'

मृणालच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी विजयसोबतच्या तिच्या फोटोंवर आनंद व्यक्त केला. चाहत्यांना दोघांमधील 'केमिस्ट्री' किती कमालीची असू शकेल याचा अंदाज आहे. एका चाहत्यांने लिहिलंय की, ये जोडी तो हिट हो गी रिलीज होने से पहले ही. अशाच आशयाच्या अनेक प्रतिक्रिया वाचायला मिळत आहे. ही जोडी गीता गोविंदमचा विक्रम तोडेल असा विश्वासही काहींना वाटतोय.

आगामी चित्रपटात विजय देवराकोंडा दुसऱ्यांदा परशुरामसोबत एकत्र येणार आहे. या दोघांनी यापूर्वी 2018 मध्ये गीता गोविंदम हा एक हिट चित्रपट दिला होता ज्यात रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत होती. विजयकडे सामंथा रुथ प्रभूसोबत कुशी हा आगामी चित्रपटदेखील आहे. तर गौतम तिन्ननुरी हे VD12 तयार करत आहे. या चित्रपटात श्रीलीला देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा -

१. Comedian suicide attempt :लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, नाना पाटेकरची मिमिक्री करतो तीर्थानंद राव

२. Adipurush box office : आदिपुरुषची विक्रमी तिकीट विक्री, २००० ची तिकीटे संपली

३. Priyanka Chopra Jonas family : पाहा, प्रियांका चोप्रा जोनासच्या कुटुंबीयांचे सुंदर आणि प्रेमळ फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.