ETV Bharat / entertainment

Dilon Ki Doria song release : 'बवाल' चित्रपटातील वरुण धवन आणि जान्हवी कपूरवर चित्रीत 'दिलों की डोरिया' गाणे रिलीज - नितीन तिवारी

'बवाल' चित्रपटातील वरुण धवन आणि जान्हवी कपूरवर चित्रीत झालेले 'दिलों की डोरिया' हे गाणे रिलीज करण्यात आलंय. विशाल मिश्रा, झहरा खान आणि रोमी यांनी गायले हे गाणे तनिश्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे.

Dilon Ki Doria song release
'दिलों की डोरिया' गाणे रिलीज
author img

By

Published : Jul 18, 2023, 1:21 PM IST

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवनच्या 'बवाल' चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'दिलों की डोरिया' असे बोल असलेले हे गाणे ऐकताना नकळत ठेका धरायला भाग पडते. हे एक मॅरेज पार्टी गाणे आहे असे आपण म्हणू शकता. गाण्याची सुरूवात जान्हवी आणि वरुण यांच्या हळदी समारंभापासून होते. मित्र आणि नातेवाईकांनी घेरलेले हे वधू वर विवाह विधी अन्जॉय करताना दिसतात. सुंदर ड्रेस परिधान केलेल्या त्यांच्या मित्र मैत्रीणी गाण्याच्या तालावर फेर धरुन नाचू लागतात. अर्थात वरुण धवन आणि जान्हवी या नर्तकांची आघाडी सांभळतात आणि एक नेत्रदीपक गाणे पडद्यावर धमाल उडवून देते.

'बवाल' चित्रपटातील 'दिलों की डोरिया' हे गाणे विशाल मिश्रा, झहरा खान आणि रोमी यांनी गायले आहे. तनिश्क बागची यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याच्या ओळी अराफत मेहमूद यांनी लिहिल्या आहेत. टी सिरीजने हे गाणे सादर केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बवाल' या रोमँटिक चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन तिवारी यांनी केले आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडताना दिसेल. या पूर्वी 'बवाल' चित्रपटातील 'तुमसे कितना प्यार करते' हे अरिजिती सिंगने गायलेले गाणे रिलीज झाले होते. मिथुन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.

वरुण धवन 'बवाल' चित्रपटात अज्जू ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. हे पात्र गुंतागुंतीच्या प्रसंगातून नेहमी उत्तम मार्ग काढणारे असे आहे. वरुणसाठी हा एक आव्हानात्मक रोल होता. त्याने साकारलेली भूमिका लोकांच्या मनात घर करेल अशी खात्री वरुणला यानिमित्ताने वाटते. हा एक अनोखी प्रेमकथा असलेला चित्रपट आहे. डोळ्या स्वप्ने पाहणाऱ्या एका साध्या मुलीची भूमिका यात जान्हवी कपूर साकारणात आहे. सामान्य मुलींच्या भावविश्वाशी साधर्म्य असलेली जान्हवीची व्यक्तीरेखा आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच 'बवाल' चित्रपटातून स्क्रिन स्पेस शेअर करत आहेत.

हेही वाचा -

१. Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर...

२. Omg 2's First Song Oonchi Oonchi Vaadi Out : 'ओएमजी २ चित्रपटामधील 'ऊॅंची ऊॅंची वादी' गाणे झाले प्रदर्शित...

३. Bai Pan Bhari Deva Box Office Collection 18 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने रचला इतिहास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.