ETV Bharat / entertainment

Urfi Javed receives death threats : उर्फी जावेदला मिळाली जीवे मारण्याची धमकी... - उर्फी जावेदला दिली यूजरने धमकी

उर्फी जावेदला एका यूजरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उर्फीने यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Urfi Javed
उर्फी जावेद
author img

By

Published : Aug 17, 2023, 3:32 PM IST

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद ही सोशल मीडिया सन्सेशन आहे. तिच्या ऑफबीट फॅशन सेन्सला हेडलाईन नेहमीच मिळते. उर्फी अनेकदा तिच्या लूकवर बरेच प्रयोग करताना दिसते. तिचे फॅशन स्टेटमेंट खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती तिच्या या फॅशन सेन्समुळे अडचणीतही येते. याशिवाय तिला खूप ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. दरम्यान आता तिला एका यूजरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उर्फी जावेदने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. उर्फीने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये उर्फीला मारण्याबद्दलची धमकी यूजरने दिली आहे.

उर्फीला जीवे मारण्याच्या धमकी : या पोस्टमध्ये यूजरने धमकी देत लिहिले, 'लवकरच तुला गोळी मारण्यात येईल. लवकरच मिशन पूर्ण होईल, तू भारतात पसरवलेली सर्व घाण साफ केली जाईल. असे या धमकी देणाऱ्या व्यक्तीने तिला म्हटले आहे. तसेच त्यानंतर उर्फीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या आयुष्यातील नियमित दिवस'. उर्फीच्या या पोस्टवर सोशल मीडियावर खूप कमेंट येत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका यूजरने लिहिले, एक जिहादी आतंकी एका फुलासारख्या मुलीला गोळी मारण्याची धमकी देत आहे' अशी या व्यक्तीने कमेंट केली आहे. याशिवाय एकाने म्हटले की, 'काही झाले तरीही आपले मनोरंजन व्हायला पाहिजे' अशा अनेक कमेंट उर्फीच्या पोस्टवर येत आहेत.

वर्कफ्रंट : उर्फीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिला 'बिग बॉस ओटीटी'मधून प्रसिद्धी मिळाली. मात्र, या शोमधील तिचा प्रवास हा चांगला नव्हता. आठवडाभरातच ती घराबाहेर पडली. पण घरातून बाहेर पडताच उर्फीच्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली. उर्फीने अनेक मालिकेत छोट्या भूमिका केल्या आहेत. अलीकडेच तिने 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये प्रमुख पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती. ती घरातल्या सगळ्यांना भेटली. पूजा भट्टने उर्फीचे खूप कौतुक केले होते.

हेही वाचा :

  1. Jailer box office Collection Day 7 : 'जेलर' चित्रपटाने जगभरात ओलांडला ४०० कोटींचा टप्पा ...
  2. OMG 2 Box Office Collection day 6 : बॉक्स ऑफिसवर 'ओह माय गॉड २'ने सहाव्या दिवशी केली 'इतकी' कमाई....
  3. Gadar 2 box office collection day 6 : सनी देओल स्टारर 'गदर २' ची 'क्लब ३०० कोटी'च्या दिशेने वाटचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.